सासू-सुनेची जुनी कथा पुन्हा उलगडणार; 'क्योंकी सास भी...' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 03:58 PM2022-02-15T15:58:56+5:302022-02-15T15:59:19+5:30

१३ वर्षांनंतर एकता कपूरचा (Ekta Kapoor) मोठा धमाका; TRP मधील पहिल्या क्रमांकाचा शो पुन्हा येणार

ekta kapoor big announcement social media insta famous show on star plus kyunki saas bhi kabhi bahu thi back again after 13 years on tv | सासू-सुनेची जुनी कथा पुन्हा उलगडणार; 'क्योंकी सास भी...' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सासू-सुनेची जुनी कथा पुन्हा उलगडणार; 'क्योंकी सास भी...' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

googlenewsNext

एकता कपूरच्या (Ekta kapoor) 'क्योंकी सास भी कभी बहू थी' (Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi) या प्रसिद्ध मालिकेने घराघरात अशी जागा निर्माण केली होती की आजही ही मालिका लोकांच्या लक्षात आहे. या मालिकेची स्टोरी लाईन तर जबरदस्त होतीच पण त्यातील पात्रांनीही लोकांच्या मनावर विशेष छाप सोडली होती. आता एकता कपूरने या मालिकेबाबत मोठी घोषणा केली आहे. याबद्दल जाणून चाहत्यांना नक्कीच आनंद होईल.

'क्योंकी सास भी कभी बहू थी' ही सीरिअल २००८ मध्ये ऑफ एअर झाली होती. अशातच १३ वर्षांच्या कालावधीनंतर एकता कपूर फॅन्ससाठी ही सीरिअल पुन्हा घेऊन येत आहे. खुद्द एकता कपूरनंच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून यासंदर्भातील माहिती दिली. 

या शो चा प्रोमो एकता कपूरनं आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरून शेअर केला आहे. "या प्रोमोची झलक पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा लोकांचं किती प्रेम मिळालं होतं याची आठवण येते. याता याच प्रवासासोबत पुन्हा जोडले जा. बुधवारपासून दररोज संध्याकाळी ५ वाजता केवळ स्टार प्लस वर," असं कॅप्शनही तिनं लिहिलं आहे.


तिघांना केलं टॅग
या कॅप्शनसोबतच एकता कपूरनं या शो चे लीड अॅक्टर्स स्मृती इराणी, अमर उपाध्याय आणि रोनित रॉय यांनाही टॅग केलं आहे. तसंच इतक्या वर्षांनंतर हा प्रोमो पाहून तुम्हाला कसं वाटतंय? असा प्रश्नही तिनं विचारला आहे.

Web Title: ekta kapoor big announcement social media insta famous show on star plus kyunki saas bhi kabhi bahu thi back again after 13 years on tv

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.