​ये मोह मोह मोह के धागे या मालिकेसाठी एजाज खानने कच्छमध्ये केले चित्रीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2017 13:00 IST2017-04-18T07:30:25+5:302017-04-18T13:00:25+5:30

ये मोह मोह के धागे ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असून या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत ...

Ejaz Khan shot in Kutch for the serial 'Moh Moh Mohaa Daa Thaar' | ​ये मोह मोह मोह के धागे या मालिकेसाठी एजाज खानने कच्छमध्ये केले चित्रीकरण

​ये मोह मोह मोह के धागे या मालिकेसाठी एजाज खानने कच्छमध्ये केले चित्रीकरण

मोह मोह के धागे ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असून या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत गावाचा सरपंच असलेला मुखी आणि अत्यंत उत्साही आधुनिक काळातील बावीस वर्षांची शहरी मुलगी अरू यांच्यातील कथा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या मालिकेची कथा ही गुजरातमधील असल्याने या मालिकेचे अधिकाधिक चित्रीकरण हे गुजरातमध्येच केले जात आहे. गुजरातमध्ये चित्रीकरण करायला मिळत असल्याने मालिकेची टीम खूपच खूश आहे. या मालिकेच्या टीममधील मंडळींनी नुकतेच कच्छमध्येदेखील चित्रीकरण केले. 
कच्छच्या वाळवंटात आतापर्यंत अनेक बॉलिवूडच्या चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. हे वाळवंट बॉलिवूडमधील मंडळीचे आवडते आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. या वाळवंटात आपल्याला सगळीकडे पसरलेली सफेद वाळू पाहायला मिळते. हे विस्तीर्ण पसरलेले वाळवंट चित्रीकरणासाठी खूपच छान आहे. त्यामुळे ये मोह मोह के धागे या मालिकेच्या टीमने चित्रीकरणासाठी या वाळवंटाची निवड केली. या वाळवंटाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे तापमानात पटकन बदल होतो. येथील तामपान कधीतरी एकदम गरम होते तर कधीतरी एकदम थंड होते. त्यामुळे येथे चित्रीकरण करणे सोपे नसते. पण तरीही या मालिकेच्या टीमने या वातावरणात चित्रीकरण केले. या मालिकेत मुखीची भूमिका साकारणाऱ्या एजाज खानवर तर या गोष्टीचा काहीच परिणाम झाला नाही. त्याने कडन उन्हामध्येदेखील आपला सर्वोत्तम अभिनय सादर केला. चित्रीकरणादरम्यान त्याने उंटासोबतदेखील खूप चांगली मैत्री केली होती. त्याने केवळ 15 मिनिटांत उंटस्वारीचे धडे अवगत केले. तो चित्रीकरणादरम्यान सहजतेने उंटावर बसत होता आणि उतरत होता. तसेच त्याच्यावर स्वारी करत होता. एवढेच नव्हे तर आजूबाजूला होणाऱ्या मोठ्या आवाजाने उंट अस्वस्थ झाल्यास तो त्याला शांतदेखील करायचा. 



Web Title: Ejaz Khan shot in Kutch for the serial 'Moh Moh Mohaa Daa Thaar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.