एकाच प्रकारचे आठ कॉच्युम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2016 14:37 IST2016-07-08T09:07:50+5:302016-07-08T14:37:50+5:30
सिया के राम या मालिकेचे चित्रीकरण हैद्राबाद येथील रामोजी सिटीमध्ये सुरू आहे. सध्या मालिकेत युद्धाचे दृश्य चित्रीत केले जात ...

एकाच प्रकारचे आठ कॉच्युम
स या के राम या मालिकेचे चित्रीकरण हैद्राबाद येथील रामोजी सिटीमध्ये सुरू आहे. सध्या मालिकेत युद्धाचे दृश्य चित्रीत केले जात असल्याने ते खुल्या मैदानात करणे गरजेचे आहे. पण पावसाचा मोसम असल्याने चित्रीकरण करत असताना सगळेच कलाकार चिंब भिजत आहेत. या सगळ्यामुळे चित्रीकरणात व्यत्यय येऊ नये म्हणून कलाकार घालत असलेल्या एकाच प्रकारच्या कॉस्च्युमचे जवळजवळ आठ सेट बनवण्यात आले आहेत. हैद्राबाद येथील वातावरणामुळे कपडे भिजल्यास ते सुकायलाही खूप वेळ लागत आहे. याचा चित्रीकरणावर परिणाम होऊ नये यासाठी कॉस्च्युमचे इतके सेट बनवले जात असल्याचे कळतेय.