चंद्र-नंदिनी या मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी श्वेता बासू प्रसादला झाला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2017 17:48 IST2017-02-27T12:18:56+5:302017-02-27T17:48:56+5:30

चंद्र नंदिनी ही मालिका सुरू झाल्यापासून ही मालिका प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. या मालिकेतील श्वेता बासू प्रसाद आणि रजत ...

During the shooting of Chandra-Nandini, Shweta Basu Prasad had an accident | चंद्र-नंदिनी या मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी श्वेता बासू प्रसादला झाला अपघात

चंद्र-नंदिनी या मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी श्वेता बासू प्रसादला झाला अपघात

द्र नंदिनी ही मालिका सुरू झाल्यापासून ही मालिका प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. या मालिकेतील श्वेता बासू प्रसाद आणि रजत टोकस यांची केमिस्ट्री तर प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या मालिकेने नुकतेच 100 भाग पूर्ण केले. यावेळी या मालिकेच्या टीमने सेटवर लाडू वाटून त्यांचा हा आनंद सेलिब्रेट केला होता.
चंद्र-नंदिनी या मालिकेत श्वेता बासू प्रसाद नंदिनी आणि रूपा अशा दोन भूमिका साकारत आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या भूमिकेसाठी ती सध्या खूपच मेहनत घेत आहे. या मालिकेचे चित्रीकरण करत असताना नुकताच तिला अपघात झाला. मालिकेचे चित्रीकरण सुरू असताना ती पायऱ्यांवरून जोरात आपटली. या सेटवर असलेल्या दिव्यातून झिरपणारे तेल काही पायऱ्यांवर सांडले होते ते तिच्या लक्षात न आल्याने ती पायऱ्यांवरून उतरत होती. त्याचवेळी तिचा पाय घसरून ती जोरात आपटली. यामुळे तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली तसेच तिचा डोळा देखील सुजला. श्वेता पडल्यानंतर तिला मालिकेच्या प्रोडक्शन टीमने लगेचच हॉस्पिटलमध्ये नेले आणि लगेचच तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. श्वेताला डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला दोन आठवडे तरी सक्तीची विश्रांती घ्यायला लागेल असे सांगितले. तसेच या दरम्यान तिने औषधोपचार व्यवस्थित घ्यावेत आणि कोणतेही स्टंट परफॉर्म करू नये असे तिला सांगण्यात आले. पण रुग्णालयातून सेटवर आल्यावर श्वेताने थोडाही आराम न करता पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात केली. तिला आता पहिल्यापेक्षा बरे वाटत असल्याने तिने पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात केली असे तिचे म्हणणे आहे. 



Web Title: During the shooting of Chandra-Nandini, Shweta Basu Prasad had an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.