​शक्ती आनंद गंगा या मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी का दिसला टेन्शनमध्ये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 16:31 IST2017-01-25T11:01:57+5:302017-01-25T16:31:57+5:30

शक्ती आनंदने क्योंकी साँस भी कभी बहू थी, सारा आकाश, भारत का वीर पुत्र - महाराणा प्रताप यांसारख्या अनेक ...

During the filming of Shakti Anand Ganga, why did you see it in tension? | ​शक्ती आनंद गंगा या मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी का दिसला टेन्शनमध्ये?

​शक्ती आनंद गंगा या मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी का दिसला टेन्शनमध्ये?

्ती आनंदने क्योंकी साँस भी कभी बहू थी, सारा आकाश, भारत का वीर पुत्र - महाराणा प्रताप यांसारख्या अनेक मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तसेच नच बलिये या कार्यक्रमात तो त्याची पत्नी सई देवधरसोबत झळकला होता. 2000च्या सुरुवातीला शक्ती आनंद हे छोट्या पडद्यावरचे एक मोठे नाव होते. पण गेल्या काही वर्षांपासून त्याने मालिकांमध्ये काम करण्याचे प्रमाण कमी केले आहे. तो दरम्यानच्या काळात बालिकावधू, आहट यांसारख्या मालिकांमध्ये दिसला होता. नुकतीच त्याची गंगा या मालिकेत एंट्री झाली आहे. गंगा या मालिकेच्या एका दृश्याचे चित्रीकरण करत असताना तो प्रचंड चिंतेत असल्याचे मालिकेच्या टीमला पाहायला मिळाले.
शक्तीला गंगा या मालिकेत गंगाची भूमिका साकारणाऱ्या आदिती शर्माला एका दृश्यात उचलून घ्यायचे होते. या दृश्याचे चित्रीकरण करत असताना तो कर्म्फटेबल नसल्याचे सगळ्यांनाच जाणवत होते. 
गंगा या मालिकेत गंगा ही नदीत बुडत असताना शिव तिला वाचवतो आणि एका सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवतो असे एक दृश्य चित्रित करायचे होते. पण या दृश्याच्यावेळी शक्तीला चांगलेच टेन्शन आले होते. आदितीला हातावर उचलून घेऊन जात असताना आपला पाय थोडा जरी घसरला तर आदितीला गंभीर दुखापत होऊ शकते याची त्याला चांगली जाणीव होती. त्यामुळे तो खूपच चिंतेत होता. त्याचे हे टेन्शन सगळ्यांना त्याच्या चेहऱ्यावरदेखील पाहायला मिळत होते. या दृश्यासाठी शक्तीने अनेक रिटेक्स दिले आणि त्यानंतरच हा सीन ओके झाला. 
शक्तीने अभिनयातून अनेक वर्षांचा ब्रेक घेतला असल्यामुळे त्याला काहीसे टेन्शन आले होते का याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Web Title: During the filming of Shakti Anand Ganga, why did you see it in tension?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.