इश्क सुभान अल्ला या मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी या कारणाने त्रस्त झाला होता अदनान खान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 15:22 IST2018-04-03T09:52:17+5:302018-04-03T15:22:17+5:30
‘झी टीव्ही’वरील ‘इश्क सुभान अल्ला’ या नव्या मालिकेत तिहेरी तोंडी तलाक या समस्येला हात घालण्यात आला असून एका तरुण ...
इश्क सुभान अल्ला या मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी या कारणाने त्रस्त झाला होता अदनान खान
‘ ी टीव्ही’वरील ‘इश्क सुभान अल्ला’ या नव्या मालिकेत तिहेरी तोंडी तलाक या समस्येला हात घालण्यात आला असून एका तरुण मुस्लीम जोडप्याला या समस्येला कसे तोंड द्यावे लागते, याचे चित्रण झारा (आयशा सिंह) आणि कबीर (अदनान खान) यांच्या वादळी प्रेमकथेतून दाखवण्यात आले आहे. या मालिकेच्या प्रारंभीच्या भागांना लाभलेल्या प्रचंड प्रेक्षकसंख्येने ही मालिका २०१७-१८ मधील सर्वाधिक प्रेक्षकसंख्या लाभलेल्या मालिकांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचली आहे. इस्लामच्या शिकवणुकीचा दैनंदिन जीवनातील गोष्टींशी कसा अर्थ लावायचा यावर झारा आणि कबीर यांच्यात मूलभूत आणि टोकाचे मतभेद असतात. पण अशातच काही घटना घडतात की, ज्यामुळे स्वतंत्र आणि उदार विचारसरणीच्या झाराला पारंपरिक विचारसरणीच्या कबीर या धर्मगुरूबरोबर निकाह करावा लागतो. या दोघांच्या निकाहमध्ये काय नाट्यपूर्ण घडामोडी घडतील, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. या मालिकेसाठी आयशा आणि अदनान प्रचंड मेहनत घेत आहेत. निकाहाच्या चित्रीकरणासाठी आयशासाठी भरजरी लेहेंगा शिवण्यात आला होता; तर पारंपरिक शेरवानीसोबत अदनानला डोक्यावर सेहरा बांधण्यात आला होता. हा सेहरा इतका वजनदार होता की, तो डोक्यावर ठेवून चित्रीकरण करणे अदनानला कठीण जात होते. त्यामुळे चित्रीकरणाच्या दरम्यान ब्रेक आला की अदनान हा सेहरा पुन्हा पुन्हा नीट बांधून घेत होता. आपल्या या अवजड सेहऱ्याबद्दल अदनान सांगतो, “मी सहा फुट उंच असलो तरी हा सेहरा माझ्यापेक्षाही उंच आहे की काय, असे मला वाटत होते. खऱ्या फुलांपासून तो बनवण्यात आला असल्याने तो फारच वजनदार बनला होता. त्यामुळे चित्रीकरणात ब्रेक आला की मला हा सेहरा पुन्हा नीट बांधून घ्यावा लागत होता. यामुळे चित्रीकरण करणे हे आव्हानात्मक बनले होते, तरी निकाहच्या प्रसंगांचे चित्रीकरण हा खूपच छान अनुभव होता. झारा आणि कबीर यांच्या निकाहचा आणि नंतरच्या नाट्याचा प्रसंग पाहताना प्रेक्षकांना मजा येईल, अशी मला आशा आहे.”
झारा आणि कबीर यांच्या निकाहमुळे त्यांच्यातील मतभेद संपुष्टात येतील? की झाराच्या अटी आणि शर्तींमुळे त्यांच्यात भांडणं होतील? आणि तलाकची वेळ आलीच, तर तो देण्यापूर्वी झाराची संमती घेणे गरजेचे ठरेल काय? याची उत्तरं प्रेक्षकांना ‘इश्क सुभान अल्ला’ ही मालिका पाहिल्यावरच मिळतील.
Also Read : तिहेरी तलाकवर भाष्य करणार इश्क सुभान अल्ला