‘डॉक्टर’मुळं गोपीच्या जीवनात येणार वादळ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2016 14:41 IST2016-06-28T09:11:43+5:302016-06-28T14:41:43+5:30

'साथ निभाना साथियाँ' या छोट्या पडद्यावरील मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे.या ट्विस्टमुळं गोपीच्या आयुष्यात आलेल्या डॉ. कृष्णाच्या एंट्रीचं खरं ...

'Doctor' will cause Gopi's life! | ‘डॉक्टर’मुळं गोपीच्या जीवनात येणार वादळ !

‘डॉक्टर’मुळं गोपीच्या जीवनात येणार वादळ !

'
;साथ निभाना साथियाँ' या छोट्या पडद्यावरील मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे.या ट्विस्टमुळं गोपीच्या आयुष्यात आलेल्या डॉ. कृष्णाच्या एंट्रीचं खरं सत्य उघड होणार आहे. या मालिकेत गोपीचा पती असलेल्या एहेमचा मृत्यू झाला. त्यानंतर गोपीच्या आयुष्यात डॉ. कृष्णा (खालिद सिद्दीकी) याची एंट्री झालीय.गोपी (देवोलिना भट्टाचार्य) आणि डॉ. कृष्णा यांचं लग्न झालं.मात्र आता हाच कृष्णा गोपीच्या आयुष्यात नवं वादळ आणणार आहे. गोपीसाठी हिरो असणारा हा डॉ. कृष्णा आता खलनायक बनणार आहे. गोपीशी जुने हिशेब चुकते करण्यासाठीच तो तिच्या आयुष्यात आल्याचं आगामी मालिकेच्या भागात उघड होणार आहे. हा डॉ. कृष्णा दुसरा तिसरा कुणी नसून याच मालिकेतील मानसीचा भाऊ आहे. याच मानसीचं एहेमवर प्रेम होतं. मानसीनं गोपीच्या गैरहजेरी एहेमची काळजी घेतलेली असते.. मात्र गोपीमुळं मानसीला एहेमपासून दूर जावं लागतं. याचाच बदला घेण्यासाठी तिचा भाऊ म्हणजे डॉ. कृष्णा गोपीच्या आयुष्यात आलाय. यासोबतच मानसी (काजल पिसाळ) हिचीही या मालिकेत रि-एंट्री होणार आहे.त्यामुळं नव्या ट्विस्ट एंड टर्नमुळं ही मालिका आणखी रंजक होणार आहे.
‘डॉक्टर’मुळं गोपीच्या जीवनात येणार वादळ !
 

Web Title: 'Doctor' will cause Gopi's life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.