कृतिकाचा कामराचे व्हॅकेशन PHOTOS पाहिलेत का तुम्ही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2017 16:37 IST2017-07-12T11:07:51+5:302017-07-12T16:37:51+5:30
रोमान्स आणि प्रेमाची जादू पसरवणारे लोकेशन्स अशी स्वित्झर्लंडची ओळख. त्यामुळंच की काय रोमान्ससाठी प्रसिद्ध असणा-या स्वित्झर्लंडनं कृतिकावरही मोहिनी घातली.शूटिंगमधून ...
कृतिकाचा कामराचे व्हॅकेशन PHOTOS पाहिलेत का तुम्ही?
र मान्स आणि प्रेमाची जादू पसरवणारे लोकेशन्स अशी स्वित्झर्लंडची ओळख. त्यामुळंच की काय रोमान्ससाठी प्रसिद्ध असणा-या स्वित्झर्लंडनं कृतिकावरही मोहिनी घातली.शूटिंगमधून ब्रेक घेत कतिकाने थोडा वेळ निवांत घालवण्यासाठी थेट स्वित्झर्लंडचं गाठलं. स्वित्झर्लंडचे अदभुत लोकेशन्सचा आनंद घेतानाचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.‘प्रेम या पहेली- चंद्रकांता’ या फॅण्टसी मालिकेत राजकन्या चंद्रकांताची भूमिका साकारणा-या कृतिका कामराने आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून अलीकडेच एक युरोपची सफर केली. या मालिकेच्या चित्रीकरणातून कृतिकाने पाच दिवस वेळ काढला आणि ती युरोपला गेली.आपल्या या पाच दिवसांच्या धमाल मस्तीने भरलेल्या सुटीबद्दल कृतिकाने सांगितले, “मी माझ्या ‘प्रेम या पहेली-चंद्रकांता’ मालिकेच्या चित्रीकरणाच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून अलीकडेच एक युरोपची टूर केली. आपले नैसर्गिक सौंदर्य आणि उत्कृष्ट खानपान सेवा आणि आतिथ्याबद्दल प्रसिध्द असलेल्या सेंट मॉरिटझमध्ये मी गेले होते. तिथे आतापर्यंत दोनदा हिवाळ्य़ातील ऑलिम्पिक्स स्पर्धा भरलेल्या आहेत. तिथे मी पर्वतारोहण केलं आणि काही शिखरांवर चढले. स्वित्झर्लंडमध्ये सध्या उन्हाळा असला, तरी तिथले पर्वत अद्याप बर्फाच्छादित आहेत. तिथे मी स्थानिक भोजनाचा आणि विविध पदार्थांचा आस्वाद घेतला. तिथल्या सरोवरात बोट सेलिंगचा कार्यक्रम पाहिला. तिथले लोकही अगत्यशील असून माझी तिथे एका स्कीइंग प्रशिक्षकाशी ओळख झाली. आता मी पुन्हा स्वित्झर्लंडला आले की तो मला स्कीइंगचं प्रशिक्षण देणार आहे.” कृतिकाने सांगितले, “मी अजून या सुटीच्या आठवणीतच रमले आहे. इतक्या सुंदर लोकेशनला भेट दिल्यानंतर आता पुन्हा मी कामाला लागणार आहे.”
![]()
![]()