​रुसलान मुमताज आणि त्याच्या पत्नीचे मॉरिशियसमधील व्हेकेशनचे फोटो तुम्ही पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 17:05 IST2017-02-21T11:35:56+5:302017-02-21T17:05:56+5:30

रुसलान मुमताजने मेरा पहला पहला प्यार या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. त्याने त्यानंतर तेरे संग, जाने कहाँ से ...

Do you see photos of Ruslan Mumtaz and his wife's vacation in Mauritius? | ​रुसलान मुमताज आणि त्याच्या पत्नीचे मॉरिशियसमधील व्हेकेशनचे फोटो तुम्ही पाहिलेत का?

​रुसलान मुमताज आणि त्याच्या पत्नीचे मॉरिशियसमधील व्हेकेशनचे फोटो तुम्ही पाहिलेत का?

सलान मुमताजने मेरा पहला पहला प्यार या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. त्याने त्यानंतर तेरे संग, जाने कहाँ से आयी है, डेंजरस इश्क, खेल तो अब शुरू हुआ है, आय डोन्ट लव्ह यू यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. पण बॉलिवूडमध्ये त्याला यश मिळत नसल्याने तो छोट्या पडद्याकडे वळला. त्याने कहता है दिल जी ले जरा या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण केले. ही त्याची मालिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्यानंतर त्याने बालिकावधू या मालिकेत काम केले. बालिकावधू या मालिकेतील त्याची भूमिका तर खूप गाजली. आपल्या करियरमध्ये स्थिरस्थावर झाल्यानंतर त्याने 2014मध्ये निराली मेहतासोबत लग्न केले.

ruslaan mumtaz wife nirali mehta
सध्या निराली आणि रुसलान मॉरिशिसला फिरायला गेले आहे. व्हेलेंटाइन डेच्या निमित्ताने ते मॉरिशियसला गेले होते. ते आता गेली कित्येक दिवस एकमेकांसोबत तिथे खूप चांगला वेळ घालवत आहे. त्यांच्या या व्हेकेशनचे फोटो त्याने नुकतेच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर टाकले आहेत. त्यातील एका फोटोत त्याची पत्नी बिकनीमध्ये दिसत आहे.

ruslaan mumtaz wife nirali mehta
तर एका फोटोत समुद्राच्या मध्यभागी ते दोघे एकमेकांना किस करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच त्यांनी बाथ टबमधील, बीचवरील अनेक फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंना अनेक कमेंट्स आणि लाइक्सदेखील मिळत आहेत. 

ruslaan mumtaz wife nirali mehta
रुसलान कित्येक महिन्यांपासून चित्रपट अथवा मालिकेत न झळकल्यामुळे त्याच्या नावाची चर्चा झाली नव्हती. पण आता या व्हेकेशनमुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे. रुसलान हा अभिनेत्री अंजना मुमताजचा मुलगा असून आईमुळेच त्याला या इंडस्ट्रीत एंट्री करणे सोपे गेले होते. 



Web Title: Do you see photos of Ruslan Mumtaz and his wife's vacation in Mauritius?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.