पडद्यावर पक्का वैरी अन् खऱ्या आयुष्यात..; तितीक्षा अन् ऐश्वर्या आहेत एकमेकींच्या जीवलग मैत्रिणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 03:32 PM2024-05-21T15:32:05+5:302024-05-21T15:32:28+5:30

Aishwarya narkar: ही दोस्ती तुटायची नाय! तितीक्षा-ऐश्वर्या यांचे हे फोटो देतील त्यांच्या मैत्रीचा पुरावा

Do not break this friendship! Titiksha-Aishwarya, who fight each other on screen, are best friends in real life. | पडद्यावर पक्का वैरी अन् खऱ्या आयुष्यात..; तितीक्षा अन् ऐश्वर्या आहेत एकमेकींच्या जीवलग मैत्रिणी

पडद्यावर पक्का वैरी अन् खऱ्या आयुष्यात..; तितीक्षा अन् ऐश्वर्या आहेत एकमेकींच्या जीवलग मैत्रिणी

छोट्या पडद्यावर सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. सध्या ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस तिची लोकप्रियता वाढत आहे. या मालिकेत अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि ऐश्वर्या नारकर या दोघीजणी महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. विशेष म्हणजे पडद्यावर एकमेकांशी सतत भांडणाऱ्या या दोघी खऱ्या आयुष्यात एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत.

ऐश्वर्या नारकर  (Aishwarya narkar) आणि तितीक्षा तावडे (titeeksha tawde) या दोघी मालिकेत एकमेकींच्या पक्क्या वैरी आहेत. त्यामुळे त्यांच्यात सतत वाद होतांना दिसतात. मात्र, पडद्यामागे यांची उत्तम गट्टी जमलेली आहे. त्या कायम एकमेकींसोबतचे फोटो वा व्हिडीओ शेअर करत असतात.

अलिकडेच ऐश्वर्या नारकर यांनी तितीक्षा सोबतचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. या फोटोमधून त्यांची मैत्री दिसून येते. विशेष म्हणजे अनेकदा या दोघी मैत्रिणी एकत्र एखाद्या ब्रँडचं प्रमोशनही करतांना दिसून येतात. यावरुन त्यांची मैत्री किती चांगली आहे याचा अंदाज येतो. त्यांच्या प्रत्येक पोस्टवर चाहते त्यांच्या मैत्रीचं कौतुक करत असतात. तसंच त्यांच्या फोटो आणि व्हिडीओजला ते लाइक, कमेंटही करतात.

Web Title: Do not break this friendship! Titiksha-Aishwarya, who fight each other on screen, are best friends in real life.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.