पुनर्विवाह! 'दिया और बाती' फेम अभिनेत्रीने प्रसिद्ध अभिनेत्याबरोबर बांधली लग्नगाठ; फोटो समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 05:29 PM2024-03-31T17:29:06+5:302024-03-31T17:30:05+5:30

दोघांचाही पहिला संसार मोडला, टीव्ही अभिनेत्रीने प्रसिद्ध अभिनेत्याशी केला 'पुर्नविवाह'

diya aur bati hum fame actress pooja singh tied knot with actor karan sharma | पुनर्विवाह! 'दिया और बाती' फेम अभिनेत्रीने प्रसिद्ध अभिनेत्याबरोबर बांधली लग्नगाठ; फोटो समोर

पुनर्विवाह! 'दिया और बाती' फेम अभिनेत्रीने प्रसिद्ध अभिनेत्याबरोबर बांधली लग्नगाठ; फोटो समोर

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. गेल्या काही महिन्यांत मराठी आणि हिंदी सिनेजगतातील सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधत त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर काहींच्या घरी लगीनघाई सुरू आहे. 'दिया और बाती' फेम अभिनेत्रीही नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. 

टीव्हीवरील गाजलेली मालिका 'दिया और बाती हम' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री पूजा सिंह लग्नाच्या बेडीत अडकली आहे. पूजाने प्रसिद्ध अभिनेता करण शर्माबरोबर सात फेरे घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. ३० मार्चला कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत पूजा आणि करणचा शाही विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नातील खास क्षणांचा व्हिडिओ समोर आला आहे. डिजायनर लेहेंग्यात पूजाचं सौंदर्य अधिक खुलून आलेलं पाहायला मिळत आहे. तर शेरवानी सूट आणि फेट्यामध्ये करण राजबिंडा दिसत आहे. चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

पूजा आणि करणचं हे दुसरं लग्न आहे. २०१७ मध्ये पूजाने कॅनडामधील बॉयफ्रेंड कपिल चटनानीशी विवाह केला होता. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नानंतर अवघ्या चारच वर्षांत घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. तर करणने २०१६मध्ये टिया कौरशी लग्न केलं होतं. पण तीनच वर्षांत त्याचा घटस्फोट झाला. आता पुन्हा लग्न करत पूजा आणि करणने नव्याने आयुष्याला सुरुवात केली आहे. 

पूजाने 'दिया और बाती हम' मालिकेत इमली राठौर ही भूमिका साकारली होती. तर करणला 'ससुराल सिमर का २' या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली. त्याने 'एक नई पहचान', 'सिर्फ तुम', 'काला टीका', 'बा बहु आौर बेबी' अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. 

Web Title: diya aur bati hum fame actress pooja singh tied knot with actor karan sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.