​दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया गोव्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2017 12:39 IST2017-02-15T07:09:46+5:302017-02-15T12:39:46+5:30

प्रत्येक कपलसाठी व्हेलेंटाईन डे हा खूप स्पेशल असतो. आपल्या जोडीदाराला छानसे सरप्राईज देण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. दिव्यांका त्रिपाठी ...

Diwali Tripathi and Vivek Dahiya in Goa | ​दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया गोव्यात

​दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया गोव्यात

रत्येक कपलसाठी व्हेलेंटाईन डे हा खूप स्पेशल असतो. आपल्या जोडीदाराला छानसे सरप्राईज देण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांच्या लग्नानंतरचा पहिला व्हेलेंटाईन त्यांनी खूप उत्साहात साजरा केला.
दिव्यांका आणि विवेक हे दोघेही डेली सोपमध्ये काम करत असल्याने त्यांचे दिवसातील अनेक तास हे चित्रीकरणात जातात. पण तरीही त्यांनी या खास दिवसासाठी त्यांच्या व्यग्र शेड्युलमधून वेळ काढला. विवेकने व्हेलेंटाईन डेला दिव्यांकाला एक खूप छान सरप्राईज प्लान केले होते. विवेक दिव्यांकाला घेऊन दोन दिवसांसाठी गोव्याला गेला आहे. गोव्याला ते दोघे एकमेकांसोबत खूप चांगला वेळ घालवत आहेत. विवेक या त्यांच्या व्हेकेशनविषयी सांगतो, "गेल्या व्हेलेंटाईन डेच्या वेळी आमचा नुकताच साखरपुडा झाला होता. त्यामुळे आम्ही दोघे श्रीलंकाला फिरायला गेलो होतो. त्यावेळी आम्ही दोघांनी खूप मजा-मस्ती केली होती. यंदाचा व्हेलेंटाईन तर आमच्यासाठी खूप खास आहे. कारण आमच्या लग्नानंतरचा हा पहिला व्हेलेंटाईन आहे. त्यामुळे आयुष्यभर हा दिवस लक्षात राहावा अशी माझी इच्छा होती. त्यामुळे या दिवशी काय करायचे याचे प्लानिंग मी कित्येक दिवसांपासून करत होतो. माझ्यामते शॉर्ट वीकेंडसाठी गोवा हे सगळ्यात चांगले ठिकाण आहे आणि त्यामुळेच मी दिव्यांकाला घेऊन गोव्याला जायचे ठरवले. खरे तर आम्हाला दोघांना खूप दिवसांसाठी व्हेकेशनवर जायचे होते. पण कामात व्यग्र असल्याने आम्हाला ते शक्य झाले नाही." 
विवेक नेहमीच दिव्यांकाला काही ना काही तरी सरप्राईज देत असतो. त्यामुळे गोव्याला गेल्यानंतर आणखी काय काय सरप्राईजेस मिळणार याची ती वाट पाहात आहे. 

Web Title: Diwali Tripathi and Vivek Dahiya in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.