दिव्यांका त्रिपाठी अभिनेत्री नसती तर असती 'या' क्षेत्रात कार्यरत, आज आहे टीव्हीवरील लोकप्रिय सून

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 02:13 PM2023-12-14T14:13:38+5:302023-12-14T14:15:56+5:30

'ये है मोहोब्बते' मालिकेतून ती घराघरात पोहोचली.

Divyanka tripathi birthday know her unknown facts love relationship khatron ke khiladi actress career | दिव्यांका त्रिपाठी अभिनेत्री नसती तर असती 'या' क्षेत्रात कार्यरत, आज आहे टीव्हीवरील लोकप्रिय सून

दिव्यांका त्रिपाठी अभिनेत्री नसती तर असती 'या' क्षेत्रात कार्यरत, आज आहे टीव्हीवरील लोकप्रिय सून

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) टेलिव्हिजन विश्वातील सर्वांची लाडकी अभिनेत्री आहे. 'ये है मोहोब्बते' (Ye Hai Mohobbatein) मालिकेतून ती घराघरात पोहोचली. अभिनयासोबतच लोकांना तिचं एकंदर व्यक्तिमत्वही आवडतं.  दिव्यांका सोशल मीडियावर नेहमीच खुलेपणाने आपले मत मांडत असते. दिव्यांकाचे सोशल मीडियावर अनेक फॉलोअर्स आहेत. 14 डिसेंबर १९८८४ साली मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये जन्मलेली दिव्यांका आज आपला वाढदिवस साजरा करते आहे. ग्लॅमर इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दिव्यांका खरंतर अभिनेत्री व्हायचं नव्हतं. 

शाळेत असताना दिव्यांका एनसीसीमध्ये कॅडेट होती. अभिनेत्रीने उत्तराखंडमधील नेहरु इंस्टिट्यूट ऑफ माऊंट नियरिंगपासून ते  पर्वतारोहणपर्यंत अनेक कोर्स केले आहेत. दिव्यांकाला लहानपणासून आर्मी अधिकारी व्हायचे होते. यासाठी तिने भोपाळमधील रायफल अ‍ॅकेडमीमध्ये रायफल शूटिंगचे ट्रेनिंग घेतलं होतं. अभिनेत्रीला यात गोल्ड मेडलदेखील मिळालं होतं.    
 
आर्मी अधिकारी होता होता दिव्यांका टीव्ही अभिनेत्री झाली. दिव्यांकाने दूरदर्शनवरील सिरिअलमधून करिअरची सुरुवात केली होती. दिव्यांका त्रिपाठी 'बनू मै तेरी दुल्हन', 'ये है मोहोब्बते' या मालिकांमधून प्रसिद्ध झाली आहे. याशिवाय ती डान्स रिअॅलिटी शो 'नच बलिए सीजन 8' ची विजेती राहिली आहे. तिने 2021 मध्ये 'खतरो के खिलाडी' मध्येही सहभाग घेतला होता. यामध्ये ती फर्स्ट रनर अप ठरली. दिव्यांकाने ८ जुलै २०१६मध्ये अभिनेता विवेक दहियासोबत लग्न केलं आहे.  

Web Title: Divyanka tripathi birthday know her unknown facts love relationship khatron ke khiladi actress career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.