बॅकलेस चोलीमधला दिशा वाकानीचा परफॉर्मन्स पाहून चाहते झाले खल्लास, व्हायरल झाला व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 18:23 IST2021-06-14T18:22:42+5:302021-06-14T18:23:53+5:30

दिशा वाकानीने पिवळ्या गोल्डन रंगाचा स्कर्ट आणि बॅकलेस चोली घातलेली आहे. या व्हिडिओमध्ये तिचा खूपच बोल्ड अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे.

disha vakani dance on darya kinari viral on social media | बॅकलेस चोलीमधला दिशा वाकानीचा परफॉर्मन्स पाहून चाहते झाले खल्लास, व्हायरल झाला व्हिडिओ

बॅकलेस चोलीमधला दिशा वाकानीचा परफॉर्मन्स पाहून चाहते झाले खल्लास, व्हायरल झाला व्हिडिओ

ठळक मुद्देसध्या दिशाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून बॅकलेस चोलीमध्ये दिशा कोळी नृत्य करताना दिसत आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील दयाबेन प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. या मालिकेत ही व्यक्तिरेखा दिशा वाकानी साकारत आहे. दिशा गेल्या अनेक महिन्यांपासून या मालिकेपासून दूर असून या मालिकेचे चाहते तिला चांगलेच मिस करत आहेत.

सध्या दिशाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून बॅकलेस चोलीमध्ये दिशा कोळी नृत्य करताना दिसत आहे. या व्हिडिओत ती एका चोराच्या भूमिकेत असून ती पोलिसांचे पॉकेट मारते. पोलीस तिचा पाठलाग करत असल्याने ती कोळ्यांच्या वस्तीत शिरते आणि दर्या किनारो एक बंगलो या गाण्यावर नृत्य करताना दिसते. 

दिशा वाकानीने पिवळ्या गोल्डन रंगाचा स्कर्ट आणि बॅकलेस चोली घातलेली आहे. या व्हिडिओमध्ये तिचा खूपच बोल्ड अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ खूप जुना असला तरी सोशल मीडियावर सध्या याच व्हिडिओची चर्चा रंगली आहे. दिशाचा हा अंदाज पाहून तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. आम्ही आता जेठालालला काय उत्तर द्यायचे असा मजेशीर प्रश्न तिचे चाहते सध्या विचारत आहेत. 

Web Title: disha vakani dance on darya kinari viral on social media