६ वर्षांनी दया बेन करणार तारक मेहतामध्ये कमबॅक?; दिशा वकानीविषयी निर्मात्यांचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 07:47 AM2023-07-31T07:47:46+5:302023-07-31T07:49:24+5:30

Tarak mehta ka ooltah chasma: दिशा मॅटर्निटी लिव्हवर गेल्यापासून ती मालिकेत परतलीच नाहीत. यामध्येच दिशा परत न येण्यामागे अनेक कारण असल्याचं म्हटलं जात होतं.  

disha-vakani-comback-tarak-mehta-ka-ooltah-chasma-tv-entertainment-asit-kumarr-modi | ६ वर्षांनी दया बेन करणार तारक मेहतामध्ये कमबॅक?; दिशा वकानीविषयी निर्मात्यांचा मोठा खुलासा

६ वर्षांनी दया बेन करणार तारक मेहतामध्ये कमबॅक?; दिशा वकानीविषयी निर्मात्यांचा मोठा खुलासा

googlenewsNext

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा (Tarak mehta ka ooltah chasma). जवळपास 15 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. परंतु, एकेकाळी लोकप्रिय ठरलेली ही मालिका गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. या मालिकेतील अनेक अभिनेत्रींनी निर्मात्यांवर गंभीर आरोप करत मालिकेतून काढता पाय घेतला आहे. एकीकडे जवळपास 5 ते 6 वर्षांपासून या मालिकेत दयाबेन नसल्यामुळे आधीच प्रेक्षक नाराज होते. त्यातच अन्य अभिनेत्रीदेखील ही मालिका सोडत असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये अनेक चर्चांना उधाण आलं आहे. यामध्येच आता मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी दयाबेन म्हणजे दिशा वकानीच्या कमबॅकविषयी सूचक वक्तव्य केलं आहे.

तारक मेहतामधील दयाबेन हे पात्र विशेष गाजलं. ही भूमिका अभिनेत्री दिशा वकानी हिने साकारली होती. परंतु,  दिशा मॅटर्निटी लिव्हवर गेल्यापासून ती मालिकेत परतलीच नाहीत. यामध्येच दिशा परत न येण्यामागे अनेक कारण असल्याचं म्हटलं जात होतं.  त्यामुळे या मालिकेत पुन्हा दयाबेनची एन्ट्री होणार का? ती भूमिका दिशा साकारणार की अन्य कोणी? असे कितीतरी प्रश्न प्रेक्षकांना पडले होते. यामध्येच आसित मोदी यांनी दयाबेनविषयी मोठं वक्तव्य केलं आहे. जे सध्या चर्चिलं जात आहे.

दिशा वकानीनं 2017 पासून मॅटर्निटी लिव्ह वर असल्याचे सांगून तारक मेहता का उल्टा चष्मामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. चाहते बऱ्याच दिवसांपासून आपल्या आवडत्या अभिनेत्रीची खूप उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. प्रेक्षकांनी देखील दयाबेन त्या मालिकेतून गेल्यापासून खूपच तीव्रपणे आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्याचे दिसून आले आहे. जेठालाल आणि दयाबेन या मालिकेतील सर्वात महत्वाच्या व्यक्तिरेखा आहेत. अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे. नुकतेच या मालिकेला 15 वर्ष पूर्ण झाले आहेत त्यामुळे असित मोदी यांनी तारक मेहताच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम पेजवर काही व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी दयाबेन मालिकेत पुन्हा येणार असल्याचं म्हटलं आहे.

काय म्हणाले असित मोदी?

15 वर्षांचा हा प्रवास तुमच्या सगळ्यांसोबत खूप आनंदात आणि छान गेला. परंतु, आजही प्रेक्षक या मालिकेतील एका कलाकाराला खूप मिस करतायेत. या 15 वर्षांमध्ये प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करुन त्यांना हसवलं आहे.  आज मी सगळ्या प्रेक्षकांना वचन देतो की या मालिकेत पुन्हा एकदा दयाबेनची एन्ट्री होईल.

दरम्यान, असित मोदी यांनी हे वक्तव्य केल्यानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांची आशा पल्लवित झाली आहे. परंतु, दयाबेनच्या भूमिकेत पुन्हा दिशा वकानी पाहायला मिळणार की अन्य दुसरी अभिनेत्री हा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे.
 

Web Title: disha-vakani-comback-tarak-mehta-ka-ooltah-chasma-tv-entertainment-asit-kumarr-modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.