दीप्ती केतकरची नवीन मालिका, 'मी संसार माझा रेखिते' या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 15:30 IST2025-11-11T15:30:01+5:302025-11-11T15:30:28+5:30

Dipti Ketkar : दीप्ती केतकरने आतापर्यंत मालिकांमध्ये विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. आता ती लवकरच एका नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

Dipti Ketkar's new series, 'Mi Sansar Maza Rekhite', will be released on this day. | दीप्ती केतकरची नवीन मालिका, 'मी संसार माझा रेखिते' या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

दीप्ती केतकरची नवीन मालिका, 'मी संसार माझा रेखिते' या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे दीप्ती केतकर. दीप्ती केतकरने आतापर्यंत मालिकांमध्ये विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. आता ती लवकरच एका नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे. ती  सन मराठीवर नव्याने सुरू होत असलेल्या 'मी संसार माझा रेखिते' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेचा प्रोमो पाहताच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

'मी संसार माझा रेखिते' या मालिकेत दीप्ती केतकर संपूर्ण कुटुंबाची काळजी घेणारी, कोणतीच अपेक्षा न ठेवता नात्यांना जपणाऱ्या अनुप्रियाच्या भूमिकेत दिसणार आहे. ही मालिका १ डिसेंबर पासून रोज रात्री ९:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत दीप्ती केतकरसह हरीश दुधाडे,  आभा बोडस, संजीवनी जाधव, प्रणिता आचरेकर, संदीप गायकवाड आणि दीप्ती सोनावणे हे कलाकार दिसणार आहेत.


दीप्ती केतकर म्हणाली...
दीप्ती केतकर भूमिकेविषयी सांगताना म्हणाली की, "'मी संसार माझा रेखिते' या मालिकेसाठी खूप उत्सुक आहे. काही काळ मी अश्याच भूमिकेची वाट पाहत होते. या मालिकेतील अनुप्रिया अगदी तशीच आहे. स्वतःच्या कुटुंबावर असलेलं प्रेम, त्यांची काळजी या सगळ्यात अनुप्रिया तिची स्वप्न बाजूला ठेवून कुटुंबासाठी प्रत्येक गोष्ट आवडीने करते. या गोष्टीचा तिला कुठेच त्रास होत नाही. अनुप्रिया आणि माझ्यात एकच फरक आहे की, मला माझ्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा आहे. अनुप्रियाच्या बाबतीत तसं नाहीये.  या मालिकेसाठी माझ्या सासूबाई, नवरा व मुलगी माझ्यापेक्षा जास्त खुश आहेत. सासूबाईंनी मला ठणकावून सांगितलं आहे की, आता पूर्णपणे कामाकडे लक्ष दे आमची काळजी करू नकोस."

''प्रत्येक मालिकेनंतर मी कुटुंबासाठी ब्रेक घेत असते पण...''
ती पुढे म्हणाली की, "माझ्यासाठी मुलीकडून "आई तू खूप छान काम करते" हे वाक्य ऐकणं कोणत्याही अवॉर्डपेक्षा मोठ आहे. मालिकेत अनुप्रियाची मुलगीही तिच्या मागे खंबीर उभी असते. या बरोबरच आमची टीम खूप जबरदस्त आहे. त्यामुळे काम करायला मज्जा येईल. हळूहळू अनुप्रियाच्या प्रत्येक छटा मला जाणून घ्यायच्या आहेत. ही मालिका प्रत्येक गृहिणीला आपलीशी वाटेल ही खात्री आहे. प्रत्येक मालिकेनंतर मी कुटुंबासाठी ब्रेक घेत असते पण आता मी थांबणार नाही. प्रेक्षकांना इतकंच सांगेन की, अनुप्रियाला भरभरून प्रेम व आशीर्वाद द्या."

Web Title : दीप्ति केतकर का नया शो 'मी संसार माझा रेखिते' जल्द ही होगा प्रीमियर

Web Summary : दीप्ति केतकर 'मी संसार माझा रेखिते' में अनुपriya के रूप में हैं, जो अपने परिवार के लिए समर्पित एक निस्वार्थ महिला हैं। 1 दिसंबर को सन मराठी पर रात 9:30 बजे प्रीमियर होने वाली, यह श्रृंखला पारिवारिक बंधन और बलिदानों की पड़ताल करती है। केतकर इस भूमिका को लेकर उत्साहित हैं, और अनुपriya के परिवार के समर्थन की कमी के बावजूद उनके समर्पण पर प्रकाश डालती हैं।

Web Title : Deepti Ketkar's New Show 'Mi Sansar Majha Rekhite' Premieres Soon

Web Summary : Deepti Ketkar stars in 'Mi Sansar Majha Rekhite' as Anupriya, a selfless woman devoted to her family. Premiering December 1st on Sun Marathi at 9:30 PM, the series explores family bonds and sacrifices. Ketkar is excited about the role, highlighting Anupriya's dedication despite lacking family support.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.