दिल मिल गये फेम करण परांजपेचे झाले निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 11:19 IST2018-03-27T05:49:49+5:302018-03-27T11:19:49+5:30
दिल मिल गये या मालिकेत करण परांजपेने जिग्नेशची भूमिका साकारली होती. आज करण अभिनयक्षेत्रात कार्यरत नसला तरी त्याची भूमिका ...

दिल मिल गये फेम करण परांजपेचे झाले निधन
द ल मिल गये या मालिकेत करण परांजपेने जिग्नेशची भूमिका साकारली होती. आज करण अभिनयक्षेत्रात कार्यरत नसला तरी त्याची भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. करणच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. करणचे नुकतेच त्याच्या राहात्या घरी निधन झाले.त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप कळलेले नसले तरी त्याचा मृत्यू हृदयविकारामुळे झाला असल्याची चर्चा आहे. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास त्याच्या आईच्या ही गोष्ट लक्षात आली. करणचा मृत्यू झोपेतच झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. करण केवळ २६ वर्षांचा होता. दिल मिल गये या मालिकेतील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.
दिल मिल गये या मालिकेत करणने करण सिंग ग्रोव्हर आणि जेनिफर विंगेटसोबत काम केले होते. करणने दिल मिल गये सोबतच संजीवनी या मालिकेत देखील काम केले होते. करणच्या अकस्मात निधनाने कलाविश्वात शोककळा पसरली असून अनेकांकडून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. करण वाहीने दिल मिल गये या मालिकेत त्याच्यासोबत काम केले होते. त्याने सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून करणला श्रद्धांजली वाहिली आहे. जिग्स तू नेहमीच आमच्या आठवणीत राहाशील अशी भावुक पोस्ट करण वाहीने लिहिली आहे. अभिनयक्षेत्रासोबतच करणने किएटिव्ह क्षेत्रातही आपले भाग्य आजमावले होते. त्याने अनेक मालिकांसाठी क्रिएटिव्ह हेड म्हणून काम केले होते. करणच्या पश्चात केवळ त्याची आई आहे.
हॉस्पिटलमध्ये इंटर्न असलेल्या काही मुलांची कथा प्रेक्षकांना दिल मिल गये या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. या इंटर्नमधील एक व्यक्तिरेखा करणने साकारली होती. या मालिकेत शिल्पा आनंद, मुस्कान मिहानी, दृष्टी धामी यांसारख्या कलाकाराच्या देखील मुख्य भूमिका होत्या. सिनेविस्ताज या कंपनीने या मालिकेची निर्मिती केली होती. या मालिकेत काम केल्यानंतर करण सिनेविस्ताजमध्ये क्रिएटिव्ह टीममध्ये काम करत होता. करणने रिझवी कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर त्याच कॉलेजमधून त्याने मास मीडियाचे शिक्षण घेतले. तो सध्या एका कंपनीत क्रिएटिव्ह टीममध्ये काम करत होता.
Also Read : करण वाहीने हेट स्टोरीचे चित्रीकरण या कारणामुळे ढकलले पुढे