तुम्ही कधी मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरच्या नवऱ्याला पाहिलंत का?,त्याचाही आहे सिनेइंडस्ट्रीशी संबंध
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 16:16 IST2022-03-18T15:56:50+5:302022-03-18T16:16:22+5:30
माझी तुझी रेशमगाठ' मालिकेतील नेहा तिच्या खऱ्या आयुष्यातील यश सोबत रंगपंचमी साजरी करताना व्हिडीओ समोर आला आहे.

तुम्ही कधी मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरच्या नवऱ्याला पाहिलंत का?,त्याचाही आहे सिनेइंडस्ट्रीशी संबंध
सध्या संपूर्ण देशभरात होळी, रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण रंगांची उधळण करत आहेत. मराठी सेलिब्रेटींचे रंगपंचमी खेळतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. 'माझी तुझी रेशमगाठ' मालिकेतील नेहा तिच्या खऱ्या आयुष्यातील यश सोबत रंगपंचमी साजरी करताना व्हिडीओ समोर आला आहे.
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आपले सेटवरचे आणि पर्सनल लाईफमधले फोटो आणि व्हिडीओ ती नेहमी इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. प्रार्थना तिचा पती अभिषेक जावकरसोबत रंगपंचमीचा उत्साहात साजरी केली आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओत अभिषेक प्रार्थनाच्या मागे उभा आहे आणि तो कॅमेऱ्याकडून बघून डोळा मारतो आहे. प्रार्थना आणि अभिषेकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
प्रार्थनाचा पतीही याच इंडस्ट्रीतील असल्याची माहिती खूप कमी जणांना आहे. प्रार्थना बेहरेने अभिषेक जावकरसोबत १४ नोव्हेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली.प्रार्थना आणि तिचा पती अभिषेक जावकर हे चित्रपटसृष्टीतील एक क्युट कपल म्हणून ओळखलं जातं.. अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे. अभिषेकने काही तेलगू चित्रपटांचे वितरण केले आहे. मूळ 'सिंघम' चित्रपटाची निर्मितीही अभिषेकनेच केली आहे. जवळपास पाच वर्षांपूर्वीच त्याने रेड बल्ब स्टुडिओज नावाची स्वतःची निर्मितीसंस्था सुरु केली.