Taarak Mehta ka ooltah chashmah: बाबांसोबत मस्ती करणाऱ्या 'या' चिमुरडीला ओळखलंत का? 'तारक मेहता...' मालिकेतून पोहोचली घराघरात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 08:43 PM2022-03-17T20:43:42+5:302022-03-18T13:04:50+5:30

वडिलांसोबत समुद्रकिनाऱ्यावर खेळणारी ही क्यूट अभिनेत्री लोकप्रिय हिंदी मालिकेच्या माध्यमातून सर्वांच्या परिचयाची झाली आहे.

did you recognize this cute girl playing with her father she is famous actress from Taarak Mehta ka ooltah chashmah | Taarak Mehta ka ooltah chashmah: बाबांसोबत मस्ती करणाऱ्या 'या' चिमुरडीला ओळखलंत का? 'तारक मेहता...' मालिकेतून पोहोचली घराघरात

Taarak Mehta ka ooltah chashmah: बाबांसोबत मस्ती करणाऱ्या 'या' चिमुरडीला ओळखलंत का? 'तारक मेहता...' मालिकेतून पोहोचली घराघरात

googlenewsNext

Taarak Mehta ka ooltah chashmah: सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून बालपणीच्या फोटोंचा ट्रेंड पाहायला मिळतोय. एखादा ट्रेंड आला की त्यात सेलिब्रिटी आणि अभिनेते मंडळी कधीच मागे राहत नाहीत. सध्या या ट्रेंडमध्ये अनेक सेलिब्रेटी सामील झाले आहेत. बॉलिवूड असू किंवा मराठी, हिंदी डेली सोप्स असूदे... सर्वच सेलिब्रेटी बालपणींच्या आठवणींना उजाळा देताहेत. हाच ट्रेंड फॉलो करत एका गाजलेल्या आणि प्रचंड लोकप्रिय असलेल्या सिरियलमधील एका अभिनेत्रीने आपला बालपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने एका व्हिडीओच्या माध्यमातून काही फोटो शेअर केले आहेत. त्यात वडिलांच्या कडेवर असलेली गोड छोटीशी चिमुरडी ही सध्या एक प्रसिद्ध कलाकार आहे.

आपल्या बालपणीचे फोटो व्हिडीओच्या माध्यमातून शेअर करणारी ही सेलिब्रिटी म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'तील निधी भानूशाली (Nidhi Bhanushali). निधी भानूशाली हिने 'तारक मेहता..' मालिकेत सोनू भिडे (Sonu Bhide) भूमिका साकारली होती. निधी या फोटोत बाबांच्या कडेवर आहे. तिने या व्यतिरिक्त तिचे एकटीचे लहाणपणीचे फोटोही पोस्ट केले आहेत. फोटो काढताना ती कॅमेऱ्याकडे न बघता बाबांशी धमालमस्ती करण्याच्या मूडमध्ये दिसते आहे. निधी सोशल मीडियावर सक्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. ती काही दिवसांपूर्वी बिकीनीमधील फोटोंमुळेही चर्चेत आली होती.

'तारक मेहता..' या शो मध्ये भिडे मास्तरांची संस्कारी मुली सोनू भिडे हिची भूमिका निधीने अतिशय खुबीने वठवली होती. पण सध्या ती बोल्ड अँड बिनधास्त अशा फोटो व व्हिडीओंमुळे तिच्या चाहत्यांना आश्चर्याचे धक्के देत असते.

निधी काही दिवसांपूर्वी गोव्यात सुट्टी एन्जॉय करत होती. तेथील समुद्रकिनाऱ्यावरील अनेक फोटो आणि व्हिडीओ तिने पोस्ट केले होते. तिने गोव्यात वॉटरस्पोर्ट्सचा आनंद लुटला होता. निधीच्या समुद्रकिनाऱ्यावरील बिकीनीमधील फोटोंची तुफान चर्चा रंगली होती. चाहत्यांमध्येही निधीच्या या बोल्ड फोटोंबद्दल चांगलंच गॉसिप झाल्याचं दिसून आलं. निधी कायमच तिच्या अशा लूक आणि फोटोजमुळे चर्चेत राहते. मात्र ती यासंदर्भात लोकं काय म्हणतील याकडे फारसं लक्ष देत नाही. 'मला जे आवडतं ते मी करते', असं तिने अनेकदा सांगितलं आहे.

Web Title: did you recognize this cute girl playing with her father she is famous actress from Taarak Mehta ka ooltah chashmah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.