कविता कौशिकचे पती रोनित बिस्वाससोबतचे क्यूट फोटो पाहिलेत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 11:29 IST2017-03-15T05:59:13+5:302017-03-15T11:29:13+5:30
एफआरआय या मालिकेमुळे नावारूपाला आलेल्या कविता कौशिकने नुकतेच रोनित बिस्वाससोबत लग्न केले. रोनित आणि कविता अनेक महिन्यांपासून नात्यात होते. ...

कविता कौशिकचे पती रोनित बिस्वाससोबतचे क्यूट फोटो पाहिलेत का?
ए आरआय या मालिकेमुळे नावारूपाला आलेल्या कविता कौशिकने नुकतेच रोनित बिस्वाससोबत लग्न केले. रोनित आणि कविता अनेक महिन्यांपासून नात्यात होते. त्यांनी धुमधडाक्यात लग्न न करता केदारनाथमधील शिव पार्वती मंदिरात जाऊन अगदी साधेपणाने लग्न केले.
![kavita kaushik and ronnit biswas]()
त्यांच्या लग्नाला केवळ 15 जणच उपस्थित होते. तिच्या काही नातेवाईकांसोबतच तिची जवळची मैत्रीण आक्षका गोराडिया आणि तिचा अमेरिकन प्रियकर ब्रेंट गोबलने या लग्नाला हजेरी लावली होती. लग्नात कविताने बनारसी साडी घातली होती आणि त्याचसोबत हिमालयातील थंडीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्यावर जॅकेटदेखील घातले होते.
![kavita kaushik and ronnit biswas]()
कविता कौशिक सध्या तिच्या आयुष्यातील हे नवीन क्षण खूपच चांगल्याप्रकारे एन्जॉय करत आहे. कविताने रोनितसोबतचे काही खूपच क्यूट फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघे खूपच खूश दिसत आहेत. कविताने हे फोटो शेअर करण्यासोबतच कॅप्शनमध्ये हार्टचा स्माइलीदेखील वापरला आहे. तिच्या या फोटोंना अनेक लाइक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.
![kavita kaushik and ronnit biswas]()
रोनितसोबत लग्न करण्याआधी कविताचे अभिनेता नवाब शहा याच्यासोबत पाच वर्षं प्रेमप्रकरण सुरू होते. त्यांनी काहीच महिन्यांपूर्वी संगनमताने त्यांच्या नात्याला पूर्णविराम दिला. कविता आणि नवाब यांना लग्न करायचे होते. पण कविताच्या आईवडिलांनी या लग्नाला नकार दिला होता. त्या दोघांचा धर्म वेगवेगळा असल्याने कविताच्या पालकांनी लग्नाला नकार दिला असल्याची चर्चा होती. आपल्या आईवडिलांना नाराज करुन लग्न करायचे नसल्याने तिने ब्रेकअपचा निर्णय घेतला होता. याच दरम्यान रोनित तिच्या आयुष्यात आला आणि त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.