दिव्यांका त्रिपाठीच्या एलियन डान्सने लावले वेड; केवळ आठ तासांतच १८ लाख लोकांनी बघितला व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2018 20:16 IST2018-03-18T14:46:14+5:302018-03-18T20:16:21+5:30

दिव्यांका त्रिपाठीने सोशल मीडियावरील चॅलेंज स्वीकारताना जबरदस्त एलियन डान्स केला. हा व्हिडीओ एवढा लोकप्रिय होत आहे की, केवळ आठ तासांतच १८ लाखांपेक्षा अधिक लोकांनी तो बघितला आहे.

Diary of Alien Dance from Tripan; In just eight hours, 18 lakh people watched the video! | दिव्यांका त्रिपाठीच्या एलियन डान्सने लावले वेड; केवळ आठ तासांतच १८ लाख लोकांनी बघितला व्हिडीओ!

दिव्यांका त्रिपाठीच्या एलियन डान्सने लावले वेड; केवळ आठ तासांतच १८ लाख लोकांनी बघितला व्हिडीओ!

व्ही जगतातील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या दिव्यांका त्रिपाठी सध्या सोशल मीडियावर भलतीच व्हायरल होत आहे. दिव्यांकाने एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यास चाहत्यांकडून प्रचंड प्रमाणात पसंत केले जात आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओला लोक वारंवार बघत आहेत. त्यामुळेच केवळ आठ तासांत तब्बल १८ लाखांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे. 

आता तुम्ही विचार करीत असाल की, या व्हिडीओमध्ये असे काय आहे की, लोक तो वारंवार बघत आहेत, तर याविषयी सविस्तरपणे सांगायचे झाल्यास या व्हिडीओमध्ये दिव्यांकाचा लूक बघण्यासारखा आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर लोक एकमेकांना --- हे चॅलेंज देत आहे. याच चॅलेंजचा स्वीकार करताना दिव्यांकाने जबरदस्त डान्स करतानाचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या चॅलेंजमध्ये ती एलियनसोबत डान्स करताना दिसत असून, तिच्या अदा बघण्यासारख्या आहेत. 
 

व्हिडीओमध्ये वाजत असलेल्या म्युझिकमध्ये एक एलियन डान्स करीत असून, त्याची कॉपी करीत दिव्यांका डान्स करीत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना दिव्यांकाने लिहिले की, ‘मी लंडनला जाण्यासाठी तयार आहे, परंतु हा एलियन माझा तोपर्यंत पिच्छा पुरविणार जोपर्यंत मी त्याच्याशी डान्स करणार नाही. 

दरम्यान, हा एलियन डान्स खूप लोकप्रिय होत असून, अनेक सेलिब्रिटीजनी हे चॅलेंज स्वीकारले आहे. ‘ये है मोहब्बते’ या टीव्ही मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळालेल्या दिव्यांकाची मालिकेमध्ये दृष्टी गेल्याचे दाखवित आहेत. त्याचबरोबर मालिकेत लवकरच एक मोठे ट्विस्ट दाखविले जाणार आहे. यासाठीच दिव्यांका लंडनला रवाना झाली आहे. यावेळी दिव्यांकाने पती विवेक दहियासोबतचाही एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

Web Title: Diary of Alien Dance from Tripan; In just eight hours, 18 lakh people watched the video!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.