दिया और बाती हम फेम दीपिका सिंगने दिला गोंडस मुलाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2017 13:28 IST2017-05-22T07:58:10+5:302017-05-22T13:28:10+5:30

दिया और बाती हम या मालिकेत दीपिका सिंगने संध्या ही भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका चांगलीच गाजली होती. ...

Dey and Baati We Fame Deepika Singh gave birth to cute son | दिया और बाती हम फेम दीपिका सिंगने दिला गोंडस मुलाला जन्म

दिया और बाती हम फेम दीपिका सिंगने दिला गोंडस मुलाला जन्म

या और बाती हम या मालिकेत दीपिका सिंगने संध्या ही भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका चांगलीच गाजली होती. या मालिकेमुळे तिला खरी प्रसिद्धी मिळाली. ही मालिका संपून आज अनेक महिने झाले असले तरी ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहे. या मालिकेचा तू सुरज मैं साझ पियाजी हा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या दुसऱ्या सिझनमध्ये दीपिकाची उणीव प्रेक्षकांना नक्कीच भासत आहेत. 
दीपिका गरोदर असल्याचे काही महिन्यांपूर्वी तिने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून तिच्या चाहत्यांना सांगितले होते. दीपिकाने नुकतेच एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. दीपिकाचे पती रोहित राज गोयल यांनी वृत्तपत्रांना ही बातमी दिली आहे. त्याने सांगितले आहे की, दीपिकाने गोंडस मुलाला जन्म दिला असून मूल आणि दीपिका या दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. आम्ही खूप खूश असून आम्ही आमचा आनंद शब्दांत व्यक्त करू शकत नाही. दीपिकाला काही दिवसांचा आराम घेण्यासाठी सांगण्यात आले आहे. 
दीपिका आणि रोहितची ओळख दिया और बाती हमच्या सेटवरच झाली होती. रोहितने या मालिकेचे दिग्दर्शन केले होते. ही मालिका सुरू असतानाच मे 2014 मध्ये दीपिका आणि रोहितने लग्न केले. दीपिकाला संध्या या व्यक्तिरेखेने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. ही मालिका संपल्यानंतर दीपिकाने छोट्या पडद्यापासून दूर राहाणेच पसंत केले होते. 
दीपिका आणि रोहित दीपिकाच्या गरोदरपणात अनेक फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगला पोस्ट करत असत. त्यामुळे सोशल नेटवर्किंगला ते त्यांच्या मुलाचा फोटो देखील लवकरात लवकर पोस्ट करतील अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. 

Web Title: Dey and Baati We Fame Deepika Singh gave birth to cute son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.