‘दिया और बाती हम’ फेम अनस राशिद उद्या अडकणार विवाह बंधनात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 22:25 IST2017-09-08T16:55:03+5:302017-09-08T22:25:10+5:30

​‘दिया और बाती हम’मधील सूरज राठी अर्थात अनस राशिद उद्या (दि. ९) विवाह बंधनात अडकणार आहे. अनसच्या होणाºया पत्नीचे नाव हिना इकबाल असून, ती त्याच्यापेक्षा १४ वर्षांनी लहान आहे.

'Dey and Baati Hum' Fame Anas Rashid will get married tomorrow! | ‘दिया और बाती हम’ फेम अनस राशिद उद्या अडकणार विवाह बंधनात!

‘दिया और बाती हम’ फेम अनस राशिद उद्या अडकणार विवाह बंधनात!

िया और बाती हम’मधील सूरज राठी अर्थात अनस राशिद उद्या (दि. ९) विवाह बंधनात अडकणार आहे. अनसच्या होणाºया पत्नीचे नाव हिना इकबाल असून, ती त्याच्यापेक्षा १४ वर्षांनी लहान आहे. काही दिवसांपूर्वीच अनस आणि हिनाचा साखरपुडा झाला होता. उद्या मुस्लीम रीतिरिवाजाप्रमाणे दोघेही विवाह बंधनात अडकणार आहेत. वास्तविक अनसचे नाव या अगोदर रित पाण्डेय हिच्यासोबत जोडले जात होते. 

टाइम्स आॅफ इंडियाला मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे ९ सप्टेंबर रोजी निकाह करणार आहेत. तर १० सप्टेंबर रोजी ‘दावत-ए-वालिमा (रिसेप्शन) ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर मलेरकोटला येथे विवाह पार पडल्यानंतर अनस मुंबईमध्ये आपल्या मित्रांबरोबर लग्नाची पार्टी सेलिब्रेट करणार आहे. अनसने त्याच्या मेहंदी सेरिमनीचे काही फोटोदेखील इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोमध्ये अनसने पांढºया रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. तर त्याच्या होणाºया बेगमने पिवळ्या रंगाचा पंजाबी सूट घातला आहे. दोघांचा जोडा शोभून दिसत आहे. अनसची होणारी पत्नी हिना हिचा इंडस्ट्रीशी काहीही संबंध नाही. ती एका कंपनीत एचआर प्रोफेशनल म्हणून काम करते. 
 

हिनाला अनसच्या आईने पसंत केले आहे. तिचे वय केवळ २४ वर्ष आहे. काही दिवसांपूर्वीच अनसने म्हटले होते की, ‘माझ्या परिवाराने मला साखरपुड्याच्या दहा दिवस अगोदरच हिनाविषयी सांगितले होते. जेव्हा मी टीनएजर होतो तेव्हा लव्ह मॅरिएजवर विश्वास ठेवायचो. परंतु आता मी माझ्या परिवारातील लोकांच्या चॉइसवर समाधानी आहे. अनसच्या परिवाराबरोबरच हिनाचा परिवारदेखील अनसविषयी खूपच खूश आणि आनंदी आहे. वास्तविक हिनासह तिचा परिवार ‘दिया और बाती हम’ या मालिकेचे चाहता आहे. 

वास्तविक अनस आणि हिनाच्या वयात खूपच मोठा एजगॅप आहे. अशातही या दोघांचा जोडा शोभून दिसत आहे. याविषयी अनसने म्हटले होते की, माझ्या वयाबद्दल हिनाची काहीच तक्रार नाही. उलट माझ्या बहिणीला वाटते की, मी केवळ २६ वर्षाचा आहे. असो, सीएनएक्स मस्ती परिवाराकडून या दोघांनाही वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा !

Web Title: 'Dey and Baati Hum' Fame Anas Rashid will get married tomorrow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.