भारतातील पहिली स्त्री डिटेक्टिव्ह रजनी पंडित यांना भेटली डिटेक्टिव्ह दीदी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 10:05 IST2017-12-08T04:35:01+5:302017-12-08T10:05:01+5:30

ती एक अतिशय खंबीर स्त्री असून तिचे निरीक्षण, तर्कसंगती आणि बारकाव्यांकडे लक्ष देण्याच्या कलेमुळे तिने आजतागायत अनेक सीरिअल किलर्स, ...

Detective Didi met Rajni Pandit, India's first woman Detective! | भारतातील पहिली स्त्री डिटेक्टिव्ह रजनी पंडित यांना भेटली डिटेक्टिव्ह दीदी!

भारतातील पहिली स्त्री डिटेक्टिव्ह रजनी पंडित यांना भेटली डिटेक्टिव्ह दीदी!

एक अतिशय खंबीर स्त्री असून तिचे निरीक्षण, तर्कसंगती आणि बारकाव्यांकडे लक्ष देण्याच्या कलेमुळे तिने आजतागायत अनेक सीरिअल किलर्स, गुन्हेगार, दिल्लीच्या अंधाऱ्या भागांतील गँगस्टर्सना पकडण्यात यशस्वी झाली आहे.गुन्हेगाराच्या विश्वात ती मोठ्‌या धैर्याने सामोरी जाते आणि गुन्हेगारांचा पर्दाफाश करते. आपल्या घरची कामे सांभाळून आपल्या परिवाराचीही ती काळजी घेते. ती म्हणजे छोट्या पडद्यावरची बंटी डिटेक्टिव्ह दीदी,जिला आपल्या शहराला गुन्हेगारांपासून वाचवण्याची गरज वाटते.पुरूषांची मक्तेदारी असलेल्या ह्या जगामध्ये बंटीने आपल्या करिअरसाठी जी निवड केली आहे त्यामुळे अनेक तरूणींना त्यांनी स्वतःच स्वतःवर घातलेल्या मर्यादा झुगारून आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करून वेगळ्‌या प्रकारचे करिअर करण्यासाठी प्रोत्साहन मिळते.डिटेक्टिव्ह दीदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनिया बालानीने नुकतीच भारतातील पहिली स्त्री डिटेक्टिव्ह रजनी पंडित यांची ह्या भूमिकेच्या तयारीसाठी भेट घेतली.त्यांच्यासोबत सोनियाने अख्खा दिवस घालवला आणि त्यामुळे तिला एका डिटेक्टिव्हच्या आयुष्याबद्दल काही खास गोष्टी माहिती झाल्या.अर्थातच आपली व्यक्तिरेखा अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी तिला यामुळे रजनी पंडीत यांची खूप मदत झाली.

गेल्या ३०  गंभीर क्रिमिनल केसेस सोडवण्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.अर्थातच,त्यामुळे सोनियाला सांगण्यासारख्या रजनी यांच्याकडे अनेक गोष्टी होत्या. सोनियाला ह्या गोष्टीचे सर्वांत जास्त आश्चर्य वाटले की एकदा रजनी ह्या संशयित गुन्हेगाराच्या घरी ६ महिन्यांहून अधिक काळ घरातील कामवाली बाई म्हणून राहिल्या होत्या आणि मग त्यांनी यशस्वीपणे त्या संशयित गुन्हेगाराच्या विरोधात भक्कम पुरावे गोळा केले.भारतातील शेरलॉक होम्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रजनी यांनी लोकांची देहबोली आणि मानसशास्त्र समजून घेण्यावर भर दिला. त्या सोनियाला म्हणाल्या, “डिटेक्टिव्हपणा हा जन्मापासूनच असतो. आपण सगळेच आपापल्या परीने डिटेक्टिव्ह असतो. सर्वांनीच नेहमी सतर्क राहायला हवे आणि गुन्हा घडत आहे याची जाणीव होताच त्याविरोधात लढायला हवे.जर आपण सगळेच असे बनलो तर देशातील गुन्हेगारीचे प्रमाण निश्चितपणे कमी होईल.” आपल्या अनुभवाबद्दल सोनिया बालानी म्हणाली,“बंटी शर्मा ही माझ्या सर्वांत कठीण भूमिकांपैकी एक आहे.आज रजनीजींसोबत बातचीत करणे हा खूपच छान अनुभव होता.त्यांनी मला दिलेल्या टिप्स निश्चितपणे मला माझ्या व्यक्तिरेखेमध्ये रोचक पैलू प्रदान करण्यास उपयोगी पडतील.रजनी यांच्याबद्दल मला एक गोष्ट भावली आणि ती म्हणजे केवळ त्या एक नावाजलेल्या आणि पुरस्कार-विजेत्या डिटेक्टिव्ह आहेत तरीही त्यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय साधे आहे.त्या कुठल्याही परिस्थितीत अगदी सहजपणे जुळुवून घेऊ शकतात.कोणाचे त्यांच्याकडे असे खास लक्षही जाणार नाही.आजही त्यांचे पाय जमिनीवरच असून त्यांच्यासारख्या व्यक्तीसोबत वेळ घालवाला त्यातून खूप शिकायला मिळाले.माझी व्यक्तिरेखा बंटीही तशीच आहे. मी साकारत असलेली भूमिका सा-यांना आवडेल अशी  आशा करते. रजनी पंडीत नेहमीच  सर्वच मुलींसाठी एक खरोखरची प्रेरणा आहेत.”

रजनीजी पुढे म्हणाल्या, “मी डिटेक्टिव्ह दीदीचे काही प्रोमोज पाहिले आहे आणि ही मालिका अतिशय प्रॉमिसिंग वाटत आहे.बंटी शर्माच्या कथेमधून निर्मात्यांना प्रेक्षकांमधील डिटेक्टिव्हला जागे करायचे आहे आणि ही चांगली गोष्ट आहे कारण सतर्क नागरिक हे गुन्हा हाताळण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे सुसज्ज असतात.सोनिया एक चांगली अभिनेत्री असून मी तिला ह्या शोसाठी शुभेच्छा देते.”

Web Title: Detective Didi met Rajni Pandit, India's first woman Detective!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.