अभिनेत्री असूनही स्वत:ला पडद्यावर पाहायला आवडत नाही-स्नेहा वाघ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2017 14:40 IST2017-03-29T09:10:56+5:302017-03-29T14:40:56+5:30
‘शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’ या ऐतिहासिक मालिकेत राज कौर या भूमिकेतील आपल्या अभिनयाने अभिनेत्री स्नेहा वाघने प्रेक्षकांवर मोहिनी ...

अभिनेत्री असूनही स्वत:ला पडद्यावर पाहायला आवडत नाही-स्नेहा वाघ
‘ ेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’ या ऐतिहासिक मालिकेत राज कौर या भूमिकेतील आपल्या अभिनयाने अभिनेत्री स्नेहा वाघने प्रेक्षकांवर मोहिनी टाकली आहे. परंतु या अभिनेत्रीला स्वत:ला पडद्यावर पाहायला आवडत नाही, ही गोष्ट फारशी कोणाला ठाऊक नसेल.तिला स्वत:ला पडद्यावर पाहायला का आवडत नाही असे विचारल्यावर स्नेहा म्हणाली, “मला स्वत:ला पडद्यावर पाहायला आवडत नाही याचं कारण मी स्वत: कशी आहे आणि मी कसा अभिनय केला आहे, हे मला चांगलं ठाऊक असतं.कधी कधी आपण आपलीच कसा अभिनय केला आहे, यावर चेष्टा करू लागतो. काहीजणांना स्वत:लाच पडद्यावर पाहात राहायला फार आवडतं आणि असे लोक स्वत:बद्दल सतत बोलत राहातात. मी त्यापैकी नाही. मी भूमिका साकारलेली मालिका सुरू असल्यास मी वाहिनी बदलते आणि इंग्रजी वाहिनी पाहते. पण मी मित्र किंवा कुटुंबियांबरोबर टीव्ही पाहात बसले असेन, तर मी तिथून निघून जाते. जे मला ओळखतात, ते माझ्या अभिनयाबद्दल माझ्याशी बोलतात. परंतु चित्रपट किंवा मालिका क्षेत्रातले लोक माझी चेष्टा करीत नाहीत कारण त्यांना मी ज्येष्ठ अभिनेत्री आहे, असं वाटतं.”मराठी चित्रपटांबद्दल विचारले असता, ती म्हणाली, “मी मराठी चित्रपटांमधून भूमिका साकारल्या आहेत, याचा मला अतिशय अभिमान वाटतो. मराठी चित्रपट परिपक्व होत असल्याचं पाहून खूप बरं वाटतं. मी अनेकांना सांगून ठेवलं आहे की त्यांच्याकडे माझ्यासाठी एखादी चांगली भूमिका असेल, तर मला त्यांनी निश्चितच सांगावं. कारण मला मराठी चित्रपटांमध्ये भूमिका रंगवायला आवडतं.”सध्या स्नेहा एका राजकन्येची आणि पंजाबचे थोर सुपुत्र महाराजा रणजितसिंग यांच्या आईची भूमिका साकारीत आहे. ती तब्बल दीड वर्षांनंतर छोट्य़ा पडद्याकडे वळली आहे. या अल्पावधीतच प्रेक्षकांना तिची भूमिका खूप आवडत आहे.