रस्त्यावर डान्स करू लागली 'संध्या बिंदणी', पाहायला मिळतोय अतरंगी अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 05:33 PM2020-12-25T17:33:38+5:302020-12-25T17:37:33+5:30

'दिया और बाती हम' ही मालिका 2011 साली छोट्या पडद्यावर दाखल झाली.अल्पावधीतच दिया और बाती हम या मालिकेने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं.या मालिकेत अभिनेत्री दीपिका सिंह हिने संध्या आणि अभिनेता अनस रशीद याने सूरज ही भूमिका साकारली होती.

Deepika Singh Tremendous Dance Video Going Viral | रस्त्यावर डान्स करू लागली 'संध्या बिंदणी', पाहायला मिळतोय अतरंगी अंदाज

रस्त्यावर डान्स करू लागली 'संध्या बिंदणी', पाहायला मिळतोय अतरंगी अंदाज

googlenewsNext

'दीया और बाती हम' मालिकेतून घराघरात पोहचलेली संध्या बींदणी म्हणजेच दीपिका सिंह सध्या काय करतेय असा प्रश्न पडणा-यांसाठी हा व्हिडीओ पाहून प्रश्नांची उत्तर मिळतील. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. दीपिका सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तिचे विविध अंदाजातील फोटो व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. नुकताच दीपिकाने रस्त्यामध्ये डान्स करत असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये कलरफूल ड्रेस तिने परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. दीपिकाने परिधान केलेला ड्रेस थोडा अतरंगी वाटत असला तरी चाहत्यांना तिचा हा मजेशीर पसंतीस पात्र ठरत आहे. 


बाळाच्या जन्मानंतर ती वर्कआऊट, डायटींग अशा गोष्टी करण्यालाही तिने प्राधान्य दिले. तिच्या इन्स्टाग्रामवर नजर टाकल्यास तुम्हाला तिचे व्हिडिओ जिममध्ये वर्कआऊट करताना आणि डान्सने वेट लॉस करतानाचे व्हिडीओ पाहायला मिळतील. त्यामुळे आता पुन्हा एकदा स्लिम ट्रीम बॉडी कमावण्यासाठी ती खूप मेहनत करत आहे. दीपिकाला सध्या अनेक मालिकांसाठी ऑफर्स येत असल्यातरी आता तिला मालिकांमध्ये रस नाही तर 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमध्ये झळकण्याची इच्छा आहे.


बाळाच्या जन्मानंतर बाळाची नीट काळजी घेता यावी म्हणून तिने मालिकेच्या शूटिंगमधू ब्रेक घेतला होता. दीपिकाने बाळाचे नाव सोहम ठेवले असून सोहम रोहित गोयल असे त्याचे संपूर्ण नाव आहे. 'दिया और बाती हम' ही मालिका 2011 साली छोट्या पडद्यावर दाखल झाली.अल्पावधीतच दिया और बाती हम या मालिकेने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं.

या मालिकेत अभिनेत्री दीपिका सिंह हिने संध्या आणि अभिनेता अनस रशीद याने सूरज ही भूमिका साकारली होती. रसिकांना दीपिका आणि अनसची ही जोडी चांगलीच भावली.राजस्थानच्या बॅकड्रॉपवर रंगणा-या दिया और बाती मालिकेने रेटिंगमध्येही सातत्य ठेवलं होतं.त्यामुळे छोट्या पडद्यावरील हिट मालिका म्हणून या मालिकेची गणना होऊ लागली होती.

Web Title: Deepika Singh Tremendous Dance Video Going Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.