देवा, तौक्ते चक्रीवादळानं भरवली होती धडकी, पण टीव्ही अभिनेत्री भर पावसात रस्त्यावर करत होती डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 20:09 IST2021-05-18T20:04:30+5:302021-05-18T20:09:35+5:30
दीपिका सिंहचे असे वागणे चाहत्यांना अजिबात आवडलेला नाही. परिस्थीतीच गांभिर्य अजिबात नसल्याच्या कमेंट्स तिच्या या व्हिडीओवर उमटत आहेत.

देवा, तौक्ते चक्रीवादळानं भरवली होती धडकी, पण टीव्ही अभिनेत्री भर पावसात रस्त्यावर करत होती डान्स
सेलिब्रेटी कधी काय करतील आणि काय नाही याचा खरंच नेम नाही. टीव्ही अभिनेत्री दीपिका सिंहचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत दीपिका भर पावसात डान्स करताना दिसते. इतकेच नाही तर रस्त्यावर अतिवृष्टीमुळे पडलेल्या झाडासमोर दीपिका डान्स करतेय. दीपिकाने नुसता डान्सत नाही केला तर पडलेल्या झाडासोबत तिने खास फोटोशूटही केले आहे. दीपिकासाठी हे सगळे काही मजा मस्ती असेल पण इतरांसाठी या वादळाने धडकी भरवली होती. अनेकांचे नुकसान झाले अशात सेलिब्रेटी मात्र डान्स करण्यात दंग होते.
दीपिकाचा हा व्हिडीओ पाहून नेटक-यांनी संताप व्यक्त केला आहे. दीपिकाचे असे वागणे चाहत्यांना अजिबात आवडलेले नाही. परिस्थितीचे गांभिर्य अजिबात नसल्याच्या कमेंट्स तिच्या या व्हिडीओवर उमटत आहेत. अनेकदा दीपिका अशा प्रकारचे व्हिडीओ करत लक्ष वेधून घेत असते. चाहत्यांची वाहवा मिळवत असते. मात्र वादळाच्या वेळी अशा प्रकारे वागून दीपिकाने काय सिद्ध केले असाच प्रश्न चाहते या व्हिडीओवर विचारताना दिसत आहेत.
सेलिब्रेटीच जर असे वागत असतील तर इतरांनी तरी काय त्यांच्याकडून बोध घ्यावा ? कोरोना काळात सगळेच घरात बंदिस्त आहेत. त्यात आलेले हे वादळ त्यामुळे घरातच राहणे सुरक्षित असूनही दीपिकाला भर पावसात डान्स करण्याचे सुचले. त्यामुळे सध्या दीपिका सिंहच्या या व्हिडीओवर वाह वा नाही तर तीव्र टीकेला सामोरे जावे लगात आहे.
'दीया और बाती हम' मालिकेतून दीपिका प्रकाशझोतात आली होती. लग्नानंतर संसारात रमली. बाळाच्या जन्मानंतर तिने काही काळासाठी ब्रेकही घेतला होता.आता दीपिकाला पुन्हा कमबॅक करायचे आहे. मोठ्या ब्रेकनंतर दीपिकाकडे ऑफर्स नाहीत. कामाच्या शोधात असलेली दीपिका सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या सतत संपर्कात असते.
चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी पब्लिसिटी मिळवण्यासाठी तिचे फोटो आणि डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावरच दीपिका चाहत्यांचे मनोरंजन करत आहे.