दिपालीने परिक्षकांना पाडले प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 17:56 IST2016-11-29T17:56:59+5:302016-11-29T17:56:59+5:30

सध्या रियालिटी शोचे प्रमाण वाढत आहे. रियालिटी शोच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याचे व्यासपीठ आहे. असाच एक ...

Deepali examined the examiners in love | दिपालीने परिक्षकांना पाडले प्रेमात

दिपालीने परिक्षकांना पाडले प्रेमात

्या रियालिटी शोचे प्रमाण वाढत आहे. रियालिटी शोच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याचे व्यासपीठ आहे. असाच एक रियालिटी शो सुपर डान्सर. देशातील विविध भागातून आलेल्या बालकलाकारांच्या कलागुणांना वाव देणाºया या कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. विशेष म्हणजे या शोची चर्चा होतेय ती पुण्याच्या अवघ्या १० वर्षांच्या दिपाली बोरकर या चिमुकलीमुळे. दिपालीने तिच्या नृत्य आणि अभिनय कौशल्याने आजवरच्या बºयाच भागांमध्ये तिन्ही परिक्षकांची मने जिंकली आहेत. सुपर डान्सरच्या नुकत्याच झालेल्या भागामध्येही दिपालीने पुन्हा एकदा तिच्या नृत्याने आणि चेहºयावरील हावभावाने प्रेक्षकांना घायाळ केले आहे.कारण, दिपालीने या कार्यक्रमात नुकतीच एक धमाकेदार लावणी सादर केली. कंगना रणौतच्या क्वीन या चित्रपटातील उडत्या ठेक्याच्या लंडन ठुमकदा या अस्सल पंजाबी गाण्यावर दिपालीने मराठमोळ्या लावणीचा ठेका धरला. गाण्याचा प्रत्येक ठेका पकडत आणि लावणीचे सौंदर्य जपत दिपालीने आणि तिच्या नृत्यदिग्दर्शिकेसह लंडन ठुमकदाचा मराठमोळा अंदाज सादर केला. दिपालीचे हे नृत्य पाहत असताना तिच्या थिरकणाºया पायांवरुन आणि नखरेल हावभावांवरुन परिक्षकांच्या नजराही हटत नव्हत्या. पारंपारिक लावणी प्रकाराला काहीशा मॉडर्न नृत्याची जोड देत दिपालीने अनेकांचीच मनं जिंकली.  अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्रा, दिग्दर्शक अनुराग बसू आणि नृत्य दिग्दर्शक गीता कपूर हे या शोचे परिक्षक आहेत. याआधीही या कार्यक्रमामध्ये चुणुकदार दिपालीच्या नृत्याची चर्चा होती. प्रत्येक वेळी वेगळ्या धाटणीचे नृत्य सादर करत दिपाली परिक्षकांना अचंबित करत असते. या कार्यक्रमाच्या पहिल्या राऊन्डमध्ये कंगना रणौतच्या बावरी हो गई या गाण्यावर दिपालीने जो दमदार परफॉर्मन्स दिला त्यानंतर सर्वांचेच चेहरे पाहण्यासारखे होते. जणू काही आपल्यासमोर कंगनाच नाचत असल्याची प्रतिक्रिया शिल्पाने दिली. गीता यांनी तर चक्क उभं राहून तिच्या नृत्याला दाद दिली. दुस-या राउन्डमध्ये दिपालीने नटरंगच्या गाण्यांवर नृत्य सादर करताच बच्चेकंपनीना मुलांना या शोमध्ये प्रशिक्षण देणा-या मेन्टर्सनी दिपालीकडे धाव घेत तिला घट्ट मिठी मारली. प्रत्येक मेन्टरने सदर शोसाठी आपल्याला दिपालीच हवी असल्याचा आग्रह परीक्षकांकडे केला. परीक्षकांनीही एकमेकांची मते न जाणता दिपालीला थेट टॉप १२ मध्ये एण्ट्री देण्याचा निर्णय घेतला होता. दिपाली केवळ नृत्यातचं पारंगत नाहीये तर तिच्या चेह-यावरील हावभावही इतके बोलके आहेत की तिच्या प्रेमात पडल्याशिवाय तुम्हीही राहू शकत नाही. सैराट या चित्रपटातील आर्चीच्या संवांदांनी तर सर्वांनाच भुरळ पाडली होती. दिपलीनेही आचीर्ची हुबेहुब भूमिका साकारत मागील एका भागामध्ये परीक्षकांना मंत्रमुग्ध केले.

Web Title: Deepali examined the examiners in love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.