स्टार कपल गुरमीत- देबिना बॅनर्जीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, दाखवली बाळाची पहिली झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 03:52 PM2022-04-04T15:52:33+5:302022-04-04T16:08:48+5:30

टीव्हीचा लोकप्रिय अभिनेता गुरमीत चौधरी व अभिनेत्री देबिना बॅनर्जी आईबाबा झालेत. सोशल मीडियावर तिने आपल्या बाळाची पहिली झलक दाखवली आहे.

Debina bonnerjee gurmeet choudhary welcome a baby girl share baby first pics | स्टार कपल गुरमीत- देबिना बॅनर्जीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, दाखवली बाळाची पहिली झलक

स्टार कपल गुरमीत- देबिना बॅनर्जीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, दाखवली बाळाची पहिली झलक

googlenewsNext

टीव्हीचा लोकप्रिय अभिनेता गुरमीत चौधरी व अभिनेत्री देबिना बॅनर्जी आईबाबा झालेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत या स्टार कपलने मुलगी झाल्याची आनंदाची बातमी दिली आहे. देबिनाने ३ एप्रिलला एक गोंडस मुलीला जन्म दिला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत देबिना आणि गुरमीत दोघांनी ही आपल्या बाळाची पहिली झलक दाखवली आहे.. या कपलने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताच, सोशल मीडिया यूजर्स देबिना आणि गुरमीत यांच्या मुलीवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि त्यांना शुभेच्छा देत आहेत.

देबिनाच्या या व्हिडिओला जवळपास 4 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. गरोदरपणात देबिनाने स्वतःची खूप काळजी घेतली आणि भरपूर योगाही केला. लग्नाच्या 11 वर्षानंतर देबिना आणि गुरमीत आई-बाबा झालेत. 

छोट्या पडद्यावर गाजलेल्या ‘रामायण’ या मालिकेत गुरमीत चौधरीने प्रभू श्रीरामाची तर त्याची पत्नी देबिनाने सीता मातेची भूमिका साकारली होती. या मालिकेच्या सेटवर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. 2006 मध्ये देबिना व गुरमीत यांनी घरून पळून जाऊन लग्न केलं होतं. गुरमीतने या लग्नाचे काही फोटो शेअर केले होते. यानंतर 2011 साली गुरमीत व देबिना यांनी पुन्हा लग्न केलं. कुटुंबीयांच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीनं हे लग्न पार पडलं होतं.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये देबिना व गुरमीत यांनी पुन्हा एकदा बंगाली रितीरिवाजाने लग्न केलं होतं. सुंदर जोडप्याच्या या तिसºया लग्नाचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. गुरमीतबद्दल सांगायचे तर मायावी, रामायण, गीत अशा अनेक मालिकांत काम केल्यानंतर तो मोठ्या पडद्याकडे वळला. कोई आप सा या चित्रपटातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर खामोशियां, मिस्टर एक्स, वजह तुम हो,लाली की शादी में लड्डू दीवाना, पलटन आदी चित्रपटांत तो दिसला.
 

Web Title: Debina bonnerjee gurmeet choudhary welcome a baby girl share baby first pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.