'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दयाबेन लवकरच करणार कमबॅक, टपूने केलं कंफर्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 14:32 IST2025-11-20T14:31:56+5:302025-11-20T14:32:36+5:30
'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेतील दयाबेनला चाहते खूप मिस करत आहेत. दिशा वकानीला मालिकेत परत पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दयाबेन लवकरच करणार कमबॅक, टपूने केलं कंफर्म
तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मध्ये दयाबेनचे पात्र खूप लोकप्रिय होते. हे पात्र दिशा वकानी (Disha Vakani)ने साकारली होती. दिशा वकानी २०१७ मध्ये प्रसुती रजेवर गेली आणि त्यानंतर ती मालिकेत परतलीच नाही. दिशाला दयाबेनच्या भूमिकेत परत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मात्र, दिशा दयाबेनची भूमिका साकारणार की नाही, याबाबत कोणतेही अपडेट नसले तरी, मालिकेत दयाबेन परत येत असल्याचा खुलासा खुद्द टप्पूने केला आहे.
मालिकेमध्ये नुकतेच दाखवण्यात आले की, महिला मंडळ क्रिकेट खेळते आणि खिडकीची काच फोडते. तर भिडे आणि अय्यरला गैरसमज होतो आणि त्यांना वाटते की टप्पूने काच फोडली आहे. त्यानंतर खूप गोंधळ होतो. मात्र नंतर प्रकरण मिटते. आता लेटेस्ट एपिसोडमध्ये टप्पू सेना बसून गप्पा मारत असते. या दरम्यान ते लोक महिला मंडळाने खिडकीची काच कशी फोडली आणि त्यानंतर जेठालाल आणि भिडे-अय्यर यांच्यात कसा गदारोळ झाला, याबद्दल बोलतात. मात्र, नंतर सर्व काही सामान्य झाले. खिडकीला नवी काचही बसवण्यात आली आणि सर्वांनी एकमेकांना माफ केले.
मालिकेत दयाबेनचं कमबॅक
यावेळी गोली कल्पना देतो की, आपण टप्पू सेना आणि महिला मंडळाचा क्रिकेट सामना ठेवायला हवा. यावर पिंकू म्हणतो की, मग तर पुरुष मंडळीही सामील होतील. तेव्हा टप्पू सर्वांना जीपीएल (गोकुळधाम प्रीमियर लीग) ची कल्पना देतो. हे ऐकून सर्वजण खूप उत्साहित होतात. मग टप्पू म्हणतो, माझी मम्मी लवकरच गोकुळधाममध्ये परत येणार आहे. तेव्हा सोनू विचारते, "काय दया आंटी येत आहेत?" मग तर गोकुलधामची शान आणखी वाढेल. दया आंटीच्या गोड किलबिलाटाने गोकुळधाम आणखी किलबिलू लागेल. मग टप्पू म्हणतो की, एकदा मम्मी आली की जीपीएल खेळण्यात आणखी मजा येईल. त्यानंतर सोनू म्हणते, दया आंटीशिवाय जीपीएल खेळण्यात मजाच नाही.