तारक मेहता का उल्टा चष्मामधील गोकुळधामवासियांवर आले हे संकट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2017 18:09 IST2017-03-31T12:39:32+5:302017-03-31T18:09:32+5:30
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत काही ना काही नवीन घडत असते. त्यामुळे प्रेक्षकांना नेहमीच खळखळून हसण्याची संधी ...
तारक मेहता का उल्टा चष्मामधील गोकुळधामवासियांवर आले हे संकट
त रक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत काही ना काही नवीन घडत असते. त्यामुळे प्रेक्षकांना नेहमीच खळखळून हसण्याची संधी मिळते. आतादेखील या मालिकेत प्रेक्षकांना एक गंमत पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील गोकुळधाम सोसायटीत राहाणाऱ्या सगळ्याच महिला एकमेकांच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्या नेहमीच आपला वेळ एकत्र घालवत असतात. अंजली, दया, कोमल, माधवी, बबिता, रोशन यांचे एकमेकांशिवाय पानदेखील हलत नाही. या महिला मिळून नेहमी किटी पार्टीदेखील करतात. तसेच एकत्र फिरायला, शॉपिंगला जातात. पण आता त्यांची ही किटी पार्टी गोकुळधाम सोसायटीमधील पुरुषांना महागात पडणार आहे. बबिताची एक मैत्रीण तिच्या घरी येणार असून तिला चांगली रत्नांची पारख आहे. त्यामुळे ती रत्न विकण्याचा व्यवसाय करते. ती गोकुळधाम सोसायटीमधील सगळ्या महिलांना एक रत्न दाखवणार आहे. या रत्नाच्या माध्यमातून तुमचा नवरा तुमच्यावर किती प्रेम करतो हे तुम्हाला कळते असे ती या महिलांना पटवून देणार आहे आणि या महिलादेखील तिच्या बोलण्यावर प्रचंड प्रभावित होऊन तिच्याकडून हे रत्न घेणार आहेत. रत्न विकत घेऊन या सगळ्या महिला याचा प्रयोग आपल्या नवऱ्यांवर करणार आहेत. त्यामुळे आपल्या पतीला हे रत्न घालायला त्या सांगणार आहेत आणि त्यातून आपले पती आपल्यावर किती प्रेम करतात याचे मोजमाप करणार आहे. पण या सगळ्यामुळे गोकुळधाम सोसायटीतील पुरुषांवर मोठे संकट येणार आहे. या रत्नाने काही चुकीचा निकाल दिला तर गोकुळधाममधील या जोडप्यांमध्ये प्रचंड भांडणं होणार यात काही शंकाच नाही.