congratulation:प्रल्हाद कुडतरकरचा लग्न सोहळा संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2017 13:02 IST2017-05-29T07:32:54+5:302017-05-29T13:02:54+5:30

‘आया मौसम लग्नाचा’ अशीच काहीशी परिस्थिती आहे. आपल्या अभिनयाने रसिकांचे मनोरंजन करणारे मराठी मनोरंजन दुनियेतील अभिनेता आणि अभिनेत्री रेशीमगाठीत ...

congratulation: The wedding ceremony of Prahlad Kudratkar | congratulation:प्रल्हाद कुडतरकरचा लग्न सोहळा संपन्न

congratulation:प्रल्हाद कुडतरकरचा लग्न सोहळा संपन्न

या मौसम लग्नाचा’ अशीच काहीशी परिस्थिती आहे. आपल्या अभिनयाने रसिकांचे मनोरंजन करणारे मराठी मनोरंजन दुनियेतील अभिनेता आणि अभिनेत्री रेशीमगाठीत अडकले आहेत. कुणी आपला जोडीदार स्वतः निवडत लव्ह मॅरेज करणे पसंत केले आहे. तर काहींनी आपल्या आईवडिल तसेच कुटुंबीयांच्या पसंतीला सकारात्मक होकार देत लग्नाच्या बंधनात अडकले आहेत.आता अशीच काहीशी खुश खबर आणखीन एका अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना दिली आहे.'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहचलेला पांडू म्हणजेच प्रल्हाद कुडतरकरने त्याच्या चाहत्यांना एक खास आणि तितकीच गोड बातमी दिली आहे. तुमच्या आमच्या सगळ्याचा लाडका पांडू आता रियल लाईफमध्ये लग्नबंधनात अडकला आहे.अंजली कानडे हिच्याशी तो रेशीमगाठीत अडकला आहे.काही महिन्यांपूर्वीच दोघांचा साखरपुडा पार पडला होता. मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत प्रल्हाद आणि अंजलीचा साखरपुडा संपन्न झाला होता.अंजली ही योगा प्रशिक्षक आहे तर सध्या प्रल्हादसुद्धा छोट्या पडद्यावरील 'नकटीच्या लग्नाला याययं हं' या मालिकेसाठी संवाद लेखन करत आहे. मालिका बंद झाली असली तरीही आजही रसिक पांडू या व्यक्तिरेखेला विसरलेले नाहीत. त्यामुळे त्याच्याशीसंबधीत प्रत्येक गोष्टीची माहिती घेण्यात रसिक उत्सुक असतात. सोशल मीडियावर प्रल्हादच्या लग्नाचे फोटो पाहून रसिकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.लग्नाचा जास्त गाजावाजा न करता जवळचे मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नाचा हा सोहळा पार पडला.




'रात्रीस खेळ चाले' मालिकेत प्रल्हादने साकारलेला विसरभोळा पांडू रसिकांना चांगलाच भावला होता.त्याची बोलण्याची शैली, त्याचं वागणं सारं काही रसिकांना भावलं होतं. विशेष म्हणजे काहीही झाल्यानंतर त्याचा ईसरलंय हा डायलॉग रसिकांच्या ओठावरही सहज रुळला होता. याच भूमिकेेने प्रल्हादला एक वेगळी ओळख मिळवून दिली होती.  

Web Title: congratulation: The wedding ceremony of Prahlad Kudratkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.