Confirmविवेक दाहिया-दिव्यांका त्रिपाठी एकमेकांच्या तालावर नाचणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2017 12:13 PM2017-03-06T12:13:46+5:302017-03-06T17:43:46+5:30

टीव्ही कलाकरांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय जोडी म्हणजे विवेक दाहिया-दिव्यांका त्रिपाठी या दोघांचे नाव आले नाही तरच नवल.नक्कीच पहिल्या क्रमांकावर येईल. ...

Confirm Vivek Dahiya-Divyanka Tripathi will dance on each other! | Confirmविवेक दाहिया-दिव्यांका त्रिपाठी एकमेकांच्या तालावर नाचणार!

Confirmविवेक दाहिया-दिव्यांका त्रिपाठी एकमेकांच्या तालावर नाचणार!

googlenewsNext
व्ही कलाकरांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय जोडी म्हणजे विवेक दाहिया-दिव्यांका त्रिपाठी या दोघांचे नाव आले नाही तरच नवल.नक्कीच पहिल्या क्रमांकावर येईल. ‘यह है मोबब्बतें’ मालिकेच्या सेटवर त्यांची ओळख एका समान मित्रामुळे झाली आणि लवकरच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. परंतु विवेकने आपल्या पालकांकरवी दिव्यांकाला रीतसर मागणी घालून गतवर्षीच्या जुलै महिन्यात विवाहबंधनात अडकले.लंडन आणि पॅरीसमध्ये साजरा केलेला मधुचंद्र आणि यंदा गोव्यात साजरा केलेला ‘व्हॅलेंटाईन डे’ हे सर्व सोशल मीडियावर अतिशय गाजले. आता नवी बातमी अशी की या दोघांनी ‘स्टार प्लस’वरील ‘नच बलिये’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोच्या आठव्या सिझनमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

विवेकने या वृत्ताला दुजोरा देताना सांगितले, “आम्ही या कार्यक्रमात सहभागी होण्याचा निर्णय अशासाठी घेतला की त्यामुळे आम्हाला अधिक काळ एकत्र राहता येईल. तसंच ‘नच बलिये’च्या कार्यक्रमात जोडप्यांवर उत्कृष्ट कामगिरी करून दाखविण्यासाठी खूप दडपण येतं, असंही मी ऐकलं आहे. तेव्हा आम्ही दोघेही या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध स्तरावर जोडले जाऊ आणि त्यातील यशापयश एकत्र अनुभवता येईल असा मी विचार केला.” डान्स रिअ‍ॅलिटी शो करण्याच्या निर्णयावर दिव्यांकाने सांगितले, “आम्ही गेली तीन वर्षं ‘यह है मोहब्बतें’ मालिकेत भूमिका साकारत आहोत. मला आता स्वत:ला आव्हान देणारं काहीतरी हवं होतं, अन्यथा तेचतेचपणामुळे मलाही कंटाळा आला होता. या शोच्या माध्यमातून आता मला आणि विवेकला वेगळा अनुभव घेता येणार आहे.  काहींना हे व्यासपीठ हौशी कलाकारांसाठी आहे असं वाटेल, पण मला जो अनुभव येत आहे त्यावरून हा खूपच गांभीर्याने घेतला जाणारा शो आहे असे वाटत असल्याचे दिव्यांकाने सांगितले.”

Web Title: Confirm Vivek Dahiya-Divyanka Tripathi will dance on each other!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.