Confirm 3 एप्रिल पासून दिया और बातीचा सिक्वेल ‘तू सूरज मैं सांझ पियाजी’ छोट्या पडद्यावर घेणार एंट्री.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2017 17:24 IST2017-03-07T11:51:29+5:302017-03-07T17:24:12+5:30

‘दिया और बाती हम’ या अत्यंत गाजलेल्या मालिकेच्या चाहत्या प्रेक्षकांसाठी आता लवकरच एक पर्वणी सुरू होणार आहे.या मालिकेचा पुढील ...

Confirm has been given from April 3 and Entry will take place on the twilight 'Tu Suraj Me Sanj Piyaji' short film. | Confirm 3 एप्रिल पासून दिया और बातीचा सिक्वेल ‘तू सूरज मैं सांझ पियाजी’ छोट्या पडद्यावर घेणार एंट्री.

Confirm 3 एप्रिल पासून दिया और बातीचा सिक्वेल ‘तू सूरज मैं सांझ पियाजी’ छोट्या पडद्यावर घेणार एंट्री.

िया और बाती हम’ या अत्यंत गाजलेल्या मालिकेच्या चाहत्या प्रेक्षकांसाठी आता लवकरच एक पर्वणी सुरू होणार आहे.या मालिकेचा पुढील भाग ‘तू सूरज मैं सांझ पियाजी’ नावाने 3 एप्रिल रोजी दुपारी 1.00 वाजता रसिकांनाही ही मालिका पाहाता येणार आहे. नव्या मालिकेत राठी कुटुंबाच्या पुढच्या पिढीची- वेद, वंश आणि कनक- कथा यांच्यावर मालिकेचे कथानक आधारित  असणार आहे. दिया और बाती  मालिकेतील नीलू वाघेला या अभिनेत्रीने साकारलेली भाभो ही एकच व्यक्तिरेखा पुढील भागात कायम ठेवण्यात आली असून मालिकेच्या कथानकाचा काळ 20 वर्षांनी पुढे नेण्यात आल्यामुळे ती वयस्कर दाखविण्यात आली आहे.

‘तू सूरज मैं सांझ पियाजी’ ही सूरज व संध्या यांची मुलगी कनक राठी हिची कथा असेल. या मालिकेची पहिली झलक खूप रंजक असून  भाभोला आपली नात  कनक का नकोशी होते, ते पाहणे मनोंरजक असणार आहे..“या मालिकेचा वारसा तसाच पुढे चालविणे हे माझ्या मनावरचं फार मोठं ओझं आहे. कनक राठीमध्ये तिच्या आई-वडिलांचे सूरज-संध्या यांचे गुण असतात. आपल्या आजीचे- भाभोचे प्रेम ती कसे परत मिळवते, याची कथा या मालिकेत सादर होईल. ही भूमिका साकारण्यास अतिशय उत्सुक असून पूर्वीच्या मालिकेवर प्रेक्षकांनी जसं उदंड प्रेम केलं,तसंच ते या मालिकेवरही करतील, अशी मला आशा आहे,” असे रिहा शर्मा म्हणाली. रिहा ‘एम. एस. धोणी’ या बायोपिकमध्येही झळकली होती. तसेच ‘इतना करो ना…’ या मालिकेतही भूमिका साकारलेली आहे.नीलू वाघेला म्हणाली, “पूर्वीच्या मालिकेत प्रेक्षकांनी जशा कौटुंबिक समस्या पाहिल्या, तशा त्या या मालिकेतही असतील. राठी कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल असलेलं प्रेम, काळजी आणि तरीही एकमेकांशी वाद घालण्याची वृत्ती या गोष्टी नव्या मालिकेतही दिसून येतील. प्रेक्षक त्या गोष्टीचा स्वीकार करतील, असं वाटतं. तुम्ही लोकांनी सूरज आणि संध्यावर उदंड प्रेम केलंत, आता त्यांची कथा त्यांच्या पश्चात पुढे सुरू राहील.”नव्या मालिकेचे प्रोमो टीव्हीवर झळकत असल्यापासून रसिक आतुरतेने या मालिकेची वाट पाहात आहेत.त्यामुळे मालिकेची टीमही रसिकांना पुन्हा भेटण्यास खूप  उत्सुक आहेत.

Web Title: Confirm has been given from April 3 and Entry will take place on the twilight 'Tu Suraj Me Sanj Piyaji' short film.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.