confirm:'ये हे मोहब्बते' मालिकेतून या कलाकाराची एक्झिट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2017 15:17 IST2017-05-25T07:15:08+5:302017-05-25T15:17:56+5:30

छोट्या पडद्यावरील ये हे मोहब्बते या मालिकेला मोठा धक्का बसला आहे. कारण या मालिकेतील एका कलाकारानं ही मालिका सोडण्याचा ...

confirm: Exhibit the artist from the series 'This Is Mohabbate' | confirm:'ये हे मोहब्बते' मालिकेतून या कलाकाराची एक्झिट 

confirm:'ये हे मोहब्बते' मालिकेतून या कलाकाराची एक्झिट 

ट्या पडद्यावरील ये हे मोहब्बते या मालिकेला मोठा धक्का बसला आहे. कारण या मालिकेतील एका कलाकारानं ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेत रोमी ही व्यक्तीरेखा साकारणा-या अभिनेता अली गोनी यानं या मालिकेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून त्यानं आपल्या निर्णयाची माहिती फॅन्सना दिली आहे. ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतना अली भलताच भावुक झाला होता. त्याने या मालिकेतील प्रमुख भूमिक साकारणारा अभिनेता करण पटेलसह असलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी त्याने आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली."जवळपास चार वर्ष पूर्ण झाली आहेत. करण माझा आवडती व्यक्ती, माझा भाऊ, माझा मित्र आणि माझ्यासाठी जणू माझं कुटुंबच बनेल याची मला बिल्कुल कल्पना नव्हती''.मी कुठेही का असेना, माझ्या जीवनात तुझं स्थान अढळ आहे. तुझी जागा कुणीच घेऊ शकणार नाही" अशी भावुक पोस्ट अलीनं सोशल मीडियावर शेअर केली आहे.



अली गोनीने स्प्लिटव्हिला या कार्यक्रमापासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. 'यै है मोहाब्बते', 'कलश', 'कुछ तो है तेरे मेरे दरमियाँ' यांसारख्या मालिकांमध्ये तो झळकला आहे. ये है मोहोब्बते या मालिकेत त्याने साकारलेली रोमी ही भूमिका प्रचंड गाजली होती. आता अली प्रेक्षकांना ढाई किलो प्रेम या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत तो एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत काही दिवसांपूर्वी किश्वर मर्चंट एका छोट्याशा भूमिकेत झळकली होती. तिच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक करण्यात आले होते. किश्वरनंतर अली आता छोट्याशा पण एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. 

Web Title: confirm: Exhibit the artist from the series 'This Is Mohabbate'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.