दुहेरी मालिकेचे ५० भाग पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2016 16:35 IST2016-07-30T11:05:30+5:302016-07-30T16:35:30+5:30
स्टार प्रवाह वरील रहस्यमय दुहेरी मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता या मालिकेने ५० भागांचा पल्ला गाठला आहे. एका ...

दुहेरी मालिकेचे ५० भाग पूर्ण
्टार प्रवाह वरील रहस्यमय दुहेरी मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता या मालिकेने ५० भागांचा पल्ला गाठला आहे. एका बहिणीसाठी दुस-या बहिणीने आपली बदललेली ओळख अशी ही कधीही न पाहिलेली दोन बहिणींची थरारक कथा तसेच संजय जाधव यांचे दिग्दर्शन, निवेदिता सराफ, तुषार दळवी, सुनील तावडे आदी कलाकारांचा सहभाग या सगळ्या गोष्टींनी प्रेक्षकांना या मालिकेत गुंतवून ठेवण्यात दुहेरीच्या संपूर्ण टीमला यश मिळाले आहे. प्रेक्षकांनी या मालिकेला अगदी पहिल्या भागापासूनच पसंती दर्शवली आहे आणि आज दुहेरीच्या ५० भागांचा पल्ला गाठल्याचा निमित्ताने दुहेरीच्या सेट वर केक कापून आनंद साजरा करण्यात आला. हि मालिका अशीच प्रेक्षकांना मनोरंजित करत राहील यात नक्कीच शंकाच नाही.
![]()