'गुलाबी साडी..'ची लाफ्टर क्वीनलाही पडली भुरळ; भारतीचा डान्स पाहून थक्क झाला गायक, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 01:22 PM2024-04-03T13:22:49+5:302024-04-03T13:24:13+5:30

भारतीने 'गुलाबी साडी' गाण्यावरचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. भारतीचा हा डान्स पाहून 'गुलाबी साडी' गाण्याचा गायक संजू राठोडही थक्क झाला आहे. त्याने या भारतीच्या या व्हिडिओवर कमेंट केली आहे.

comedian bharti singh dance on gulabi sadi song singer sanju rathod commented | 'गुलाबी साडी..'ची लाफ्टर क्वीनलाही पडली भुरळ; भारतीचा डान्स पाहून थक्क झाला गायक, म्हणाला...

'गुलाबी साडी..'ची लाफ्टर क्वीनलाही पडली भुरळ; भारतीचा डान्स पाहून थक्क झाला गायक, म्हणाला...

सोशल मीडियावर अनेक गाणी ट्रेंडिंग होत असतात. त्यावरील अनेक रीलही व्हायरल होत असतात. सध्या एका मराठमोळ्या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 'गुलाबी साडी' हे गाणं प्रचंड व्हायरल झालं आहे. अनेक सेलिब्रिटींनाही या गाण्याची भुरळ पडली आहे. मराठीबरोबरच बॉलिवूड सेलिब्रिटीही 'गुलाबी साडी' गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. आत्तापर्यंत अनेक कलाकारांनी या गाण्यावर रील व्हिडिओ बनवला आहे. आता लाफ्टर क्वीन भारती सिंहलाही या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आलेला नाही. 

भारतीने 'गुलाबी साडी' गाण्यावरचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत ती गुलाबी गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तिच्याबरोबर प्रतिक उतेकर, गौरव शर्मा, शर्वरी घुरपुडे, अंजली चव्हाण हे कलाकारदेखील 'गुलाबी साडी' गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. डान्स दिवानेच्या मंचावर कलाकारांनी 'गुलाबी साडी' गाण्यावर डान्स केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

भारतीचा हा डान्स पाहून 'गुलाबी साडी' गाण्याचा गायक संजू राठोडही थक्क झाला आहे. त्याने या भारतीच्या या व्हिडिओवर कमेंट केली आहे. "भारी मॅम" असं म्हणत त्याने इमोजी पोस्ट केले आहेत. या व्हिडिओवर सुनिल शेट्टीने हार्ट इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे. 

कॉमेडियन भारती सिंहने टॅलेंटच्या जोरावर कलाविश्वात नाव कमावलं. अनेक कॉमेडी शोमधून प्रेक्षकांना खळखळवून हसवणारी भारती लाफ्टर क्वीन आहे. तिने हर्ष लिंबाचियाशी लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. त्यांना एक मुलगाही आहे. भारती सोशल मीडियावर सक्रिय असून करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट चाहत्यांना देत असते.

Web Title: comedian bharti singh dance on gulabi sadi song singer sanju rathod commented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.