या मालिकेच्या सेटवर कलाकारांमध्ये रंगतो कोल्ड वॉर,इतरांची वाढली डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 02:02 PM2018-07-06T14:02:11+5:302018-07-06T14:02:29+5:30

या मालिकेतील मुस्कानच्या भूमिकेसाठी हर्षाली मल्होत्राची निवड करण्यात आली होती.परंतु त्यामुळे हर्षालीला सिनेमावर लक्ष केंद्रित करायचे होते त्यामुळे तिने या मालिकेत काम करण्यास नकार दिला होता. त्यामुळे सोनाक्षी सावे या मुलीची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली होती.

The cold war, the increased headache of others, is featured on the sets of the series | या मालिकेच्या सेटवर कलाकारांमध्ये रंगतो कोल्ड वॉर,इतरांची वाढली डोकेदुखी

या मालिकेच्या सेटवर कलाकारांमध्ये रंगतो कोल्ड वॉर,इतरांची वाढली डोकेदुखी

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील कलाकारांचे  सहकलाकारासह काही ना काही खडके उडत असतात.  ‘मुस्कान’ या मालिकेतही असेच काहीसा प्रकार घडत असल्याचे चर्चा ऐकायला मिळत आहेत.मालिकेत कोठीवरील नर्तिकांच्या भूमिका साकारणा-या अरिना डे, रिचा सोनी, लविना टंडन, हिमांशी जैन आणि मोनिषा डोळे या पाच अभिनेत्रींमध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टींमुळे खटके उडत असतात. त्यामुळे ऑनस्क्रीन दिसत असलणारे त्याचे नाते ऑफस्क्रीन मात्र मालिकेच्या टीमला डोकेदुखी ठरत असल्याचे समजतंय. लविना टंडन आणि रिचा सोनी यांचे  अभिनेत्रींसह सतत वादविवाद होत असतात.नवीन अभिनेत्रींना तर या दोघी  आपल्या मेक-अप रूममध्ये प्रवेश करू देत नाहीत. या सर्वच अभिनेत्रींच्या या मालिकेतील भूमिका महत्त्वाच्या तरीही त्यांना आपल्या भूमिकां दुर्लक्षित होत असल्यासारखे वाटत असते.कलाकारांमध्ये एकमेकांबद्दल गैरसमज आणि मतभेद होणे हे काही नवीन राहिले नाही.यापूर्वीही अशाच खटके उडत असल्यामुळे थेट मालिका कलाकारांनी सोडल्याचे अनेक उदाहरणं आहेत.त्यामुळे ‘मुस्कान’ ही मालिकाही त्यास अपवाद नाही.

सुदैवाने या अभिनेत्री शूटिंगवेळी  एकमेकींबरोबर चर्चा करतात, त्यामुळे त्यांच्यातील विसंवादाचा फटका निदान मालिकेला तरी बसलेला नाही. पडद्यामागे भलेही त्यांच्यात वैर किंवा स्पर्धा असेल, पण मालिकेत आपली भूमिका उत्कृष्टपणे साकारताना त्या कोणतीही कसर सोडत नाहीत.त्यामुळे तुझं माझं जमेना आणि तुझ्याविना करमेना असाच प्रकार मालिकेच्या सेटवर रोज पाहायला मिळत आहे.

मुस्कान ही मालिका नेहमीच्या सासू-सुनेच्या मालिकांपेक्षा अगदी वेगळी आहे.या मालिकेला यापूर्वी ‘तवायफ’ आणि ‘मीना बाजार’ अशी शीर्षके देण्यात आली होती; परंतु मालिकेचे कथानक वेगळे असल्यामुळे  ‘मुस्कान’ असे नामकरण करण्यात आले.‘रश्मी शर्मा टेलिफिल्म्स’ने या मालिकेची निर्मिती केली असून दिलीपकुमार हे तिचे दिग्दर्शक आहेत. अल्पावधीतच मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.मालिकेतील सगळ्याच कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने रसिकांची पसंती मिळवल्याचे पाहायला मिळत आहे.‘बालिका बधू’, ‘डोली अरमानों की’ मालिकेमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री नेहा मर्दाही मालिकेत झळकत आहे.या मालिकेतील मुस्कानच्या भूमिकेसाठी हर्षाली मल्होत्राची निवड करण्यात आली होती.परंतु त्यामुळे हर्षालीला सिनेमावर लक्ष केंद्रित करायचे होते त्यामुळे तिने या मालिकेत काम करण्यास नकार दिला होता. त्यामुळे सोनाक्षी सावे या मुलीची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली होती.
 

Web Title: The cold war, the increased headache of others, is featured on the sets of the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.