सीआयडी फेम जान्हवी छेडा लवकरच होणार आई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2017 12:17 IST2017-07-04T06:47:58+5:302017-07-04T12:17:58+5:30

छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध जोडी म्हणून करण मेहरा आणि निशा रावळ यांना ओळखले जाते. त्यांच्या आयुष्यात नुकताच एक छोटूसा पाहुणा ...

CID Fem Janhavi Chheda is going to be soon | सीआयडी फेम जान्हवी छेडा लवकरच होणार आई

सीआयडी फेम जान्हवी छेडा लवकरच होणार आई

ट्या पडद्यावरची प्रसिद्ध जोडी म्हणून करण मेहरा आणि निशा रावळ यांना ओळखले जाते. त्यांच्या आयुष्यात नुकताच एक छोटूसा पाहुणा आला आहे. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील नैतिक या भूमिकेमुळे करण नावारूपाला आला होता. त्यानंतर तो बिग बॉस या कार्यक्रमात झळकला होता. सध्या तो त्याचा संपूर्ण वेळ त्याच्या मुलाला देत आहे. 
करणनंतर आता छोट्या पडद्यावरच्या आणखी एका कलाकाराच्या घरी छोटुसा पाहुणा येणार आहे. अभिनेत्री जान्हवी छेडा लवकरच आई होणार आहे. जान्हवीने आतापर्यंत छुना है आसमान, मायका, तेरा मुझसे है पहले का नाता कोई यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. सीआयडी या मालिकेत तिने साकारलेली इन्स्पेक्टर श्रेया आणि बालिकावधू या मालिकेत तिने साकारलेली सगुणा ही भूमिका प्रचंड गाजली होती. जान्हवी गेल्या कित्येक महिन्यांपासून छोट्या पडद्यापासून दूर आहे.
जान्हवी गरोदर असून तिचे हे पहिले बाळ आहे. जान्हवी तिच्या या पहिल्या बाळासाठी खूप उत्सुक आहे. जान्हवीनेच ही गोड बातमी ट्विटरवरून तिच्या चाहत्यांना दिली आहे. तिने तिचा एक फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगला पोस्ट केला आहे. या फोटोत तिचे बेबी बम्प आपल्याला दिसत आहे. या फोटोत ती खूप सुंदर आणि आनंदी देखील दिसत आहे. या फोटोसोबत तिने जेव्हा तुम्ही मॉमी कांगारू सारखे दिसता... असे लिहिले आहे. जान्हवीला सध्या सहावा महिना सुरू असून ती आणि तिचे पती आतुरतनेने बाळाची वाट पाहात आहेत. 
जान्हवीने 2011 मध्ये तिचा प्रियकर निशांत गोपालियासोबत लग्न केले. ती तिच्या नवऱ्यासोबतचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असते.  

Web Title: CID Fem Janhavi Chheda is going to be soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.