लहानपणीच हरपले वडिलांचे छत्र; आता असे आयुष्य जगतो ‘बिग बॉस’चा हा जल्लाद !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 16:16 IST2017-10-05T10:39:57+5:302017-10-05T16:16:07+5:30

बिग बॉस सीजनमध्ये दिसणारा जल्लाद वास्तविक जीवनात कसा आहे. हे जाणून घेण्यासाठी, वाचा सविस्तर !

Childhood umbrella; Now lives like this 'Big Boss' hangman! | लहानपणीच हरपले वडिलांचे छत्र; आता असे आयुष्य जगतो ‘बिग बॉस’चा हा जल्लाद !

लहानपणीच हरपले वडिलांचे छत्र; आता असे आयुष्य जगतो ‘बिग बॉस’चा हा जल्लाद !

लिवूडचा दबंग स्टार सलमान खान होस्ट करीत असलेल्या ‘बिग बॉस सीजन ११’ची सुरुवात झाली असून, घरात अनेक वादग्रस्त सेलिब्रिटींना प्रवेश देण्यात आला आहे. एकूण १८ स्पर्धक घरात असून, ४ ‘पडोसी’ना घरात प्रवेश देण्यात आला आहे. वास्तविक प्रत्येक सीजनमध्ये नवा चेहरा या स्पर्धेचा भाग बनला जातो. मात्र काही चेहरे असे आहेत, जे अजूनही बदलेले नाहीत. आता तुम्ही म्हणाल की, हे चेहरे कोणते? तर पहिला चेहरा सलमान खानचा आणि दुसरा चेहरा जल्लाद नावाने प्रसिद्ध झालेल्या चिंतन गंगर याचा आहे. होय, चिंतन या शोमध्ये ७, ८, १० या सीजनमध्ये झळकला आहे. तसेच तो ११ व्या सीजनचाही भाग बनला आहे. 
 

जल्लाद म्हणून जेव्हा चिंतनची एंट्री होते, तेव्हा एवढ्या भयानक आणि गंभीर चेहºयाचा हा व्यक्ती कोण? असा प्रेक्षकांना नेहमीच प्रश्न पडतो. परंतु चिंतनचा इथप्रर्यंतचा प्रवास खूपच संघर्षपूर्ण असा राहिला आहे. चिंतनचा जन्म गुजरात राज्यात झाला. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून तो आई चेतना गंगर यांच्यासोबत मुंबईतील दहिसर भागात वास्तव्यास आहे. चिंतन जेव्हा १६ वर्षांचा होता, तेव्हाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्याला अतिशय संघर्ष करून स्वत:सह परिवाराला सावरावे लागले. वास्तविक चिंतनला लहानपणापासूनच अभिनयाचा शौक होता. अभिनयाव्यतिरिक्त त्याला गायन, डान्स आणि नाइट आउट करणे आवडते.  
 

चिंतन पहिल्यांदा बिग बॉसच्या सीजन-७ मध्ये बघावयास मिळाला. असे म्हटले जाते की, सातवा सीजन सुरू होण्याअगोदर चिंंतनचा एक मित्र त्याला टीम शोच्या कॉर्डिनेटरकडे घेऊन गेला होता. चिंतन बघताच कॉर्डिनेटरने त्याला स्क्रीन टेस्टकरिता सिलेक्ट केले. दुसºया दिवशी सहा लोकांना मागे टाकत चिंतन स्क्रीन टेस्टमध्ये पास झाला. त्यानंतर त्याचा बिग बॉसच्या घरातील जल्लादचा प्रवास सुरू झाला. 
 

शोमध्ये नेहमीच सिरीयस मूडमध्ये दिसणारा चिंतन वास्तविक जीवनात खूपच वेगळा आहे. कारण इन्स्टाग्राम अकाउंटवरील त्याचे फोटो बघितल्यास तुमच्या लक्षात येईल की, चिंतन गंभीर राहण्यापेक्षा हसतखेळत राहणे पसंत करतो. चिंतन सलमानला त्याचा गॉडफादर समजतो. त्याच्या मते, सलमान खूपच सपोर्टिंग व्यक्ती आहे. नव्या लोकांना तो संधी देत असल्याचे चिंतन सांगतो. 

Web Title: Childhood umbrella; Now lives like this 'Big Boss' hangman!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.