हासिल या मालिकेच्या सेटवर वत्सल सेठ बनला चायवाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 11:35 IST2017-11-23T06:05:23+5:302017-11-23T11:35:23+5:30

सोनी वाहिनीवर हासिल ही मालिका काहीच दिवसांपूर्वी सुरू झाली आहे. या मालिकेची कथा, या मालिकेतील व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. ...

Chaywalla became Vatsal Seth on the set series | हासिल या मालिकेच्या सेटवर वत्सल सेठ बनला चायवाला

हासिल या मालिकेच्या सेटवर वत्सल सेठ बनला चायवाला

नी वाहिनीवर हासिल ही मालिका काहीच दिवसांपूर्वी सुरू झाली आहे. या मालिकेची कथा, या मालिकेतील व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेत वत्सल सेठ प्रेक्षकांना कबीर या भूमिकेत पाहायला मिळत आहे. कबीरच्या भूमिकेचे सध्या सगळेच कौतुक करत आहेत. हासिल या मालिकेच्या आधी वत्सल रिश्तो का सौदागर-बाजीगर या मालिकेत झळकला होता. त्याच्या या भूमिकेला देखील प्रेक्षकांची खूपच चांगली पसंती मिळाली होती.  
वत्सलला चहा खूप आवडतो आणि त्यातही मसाला चहा म्हणजे त्याचा जीव की प्राण. आले, वेलची टाकलेला स्पेशल चहा त्याला खूप आवडतो. त्याला एकदा चहाची तलब आली की, लगेचच त्याच्यासमोर चहा आला पाहिजे असे त्याला वाटत असते. पण काही वेळ चहा बनवण्यासाठी सेटवर कोणी नसतं किंवा एखाद्याने बनवलेला चहा वत्सलला आवडला नाही तर तो लगेचच स्वतः जाऊन चहा बनवतो. तो स्वतःसाठीच नव्हे तर त्याच्या सहकलाकारांसाठी देखील अनेकवेळा चहा बनवतो. त्यामुळे मालिकेच्या सेटवर तो अभिनेता असण्यासोबतच अनेकवेळा चहावाला देखील असतो असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. वत्सल खूपच चांगला चहा बनवतो असे त्याच्या टीममधील अनेकांचे म्हणणे आहे. याविषयी वत्सल सांगतो, मला चहा प्रचंड आवडतो. मी चहासाठी वेडा आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. माझ्या दिवसाची सुरुवात ही चहानेच होते. चहाच्या टेस्टच्या बाबतीत मी खूपच अलर्ट असतो. मला चांगला चहा मिळाला नाही तर माझा दिवस खराब जातो असे मला वाटते. चहा प्यायल्यानंतर आपल्याला एक वेगळ्या प्रकारची एनर्जी मिळते आणि सगळा ताणतणाव, आळस दूर होतो असे माझे म्हणणे आहे. कधी तरी सेटवर चहा बनवणारा व्यक्ती नसतो किंवा एखाद्याने बनवलेली चहा मला आवडत नाही. अशावेळी मी थांबून न राहाता स्वतः माझा चहा बनवतो. 
हासिल या मालिकेत वत्सल सेठसोबत निकिता दत्ता आणि झायद खान मुख्य भूमिकेत आहेत. निकिता आणि झायद यांना देखील वत्सलने बनवलेला चहा खूपच आवडतो. त्याची चहा बनवण्याची पद्धत खूप वेगळी असून तो टेस्टी चहा बनवतो असे त्यांचे म्हणणे आहे. 

Web Title: Chaywalla became Vatsal Seth on the set series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.