‘भूमिका साकारणं माझ्यासाठी आव्हान’ - लक्ष लालवानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 18:09 IST2017-11-22T12:39:49+5:302017-11-22T18:09:49+5:30

अबोली कुलकर्णी  अभिनेता लक्ष लालवानी याने छोट्या पडद्यावर ‘अधुरी कहानी हमारी’,‘प्यार तुने क्या किया’, ‘वॉरिअर हाय’ अशा अनेक मालिकांमध्ये ...

Challenge for me to play a role. ' | ‘भूमिका साकारणं माझ्यासाठी आव्हान’ - लक्ष लालवानी

‘भूमिका साकारणं माझ्यासाठी आव्हान’ - लक्ष लालवानी

ong>अबोली कुलकर्णी 

अभिनेता लक्ष लालवानी याने छोट्या पडद्यावर ‘अधुरी कहानी हमारी’,‘प्यार तुने क्या किया’, ‘वॉरिअर हाय’ अशा अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. पार्थ या व्यक्तिरेखेमुळे तो घराघरांत पोहोचला. आता लक्ष लालवानी हा ‘पोरस’ या सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील मालिकेत पोरसच्या भूमिकेत दिसतो आहे. त्याच्याशी या मालिकेविषयी आणि एकंदरितच आत्तापर्यंतच्या कारकिर्दीविषयी मारलेल्या गप्पा...

*  एम.टी.व्ही.के ‘वॉरिअर हाय’ या शोमध्ये तू पार्थची भूमिका साकारली. पार्थच्या व्यक्तिरेखेने तुला ओळख मिळवून दिली. तर कसा होता पार्थ ते पोरसचा प्रवास?
- खरं सांगायचं तर, पार्थ साकारत असताना मी भूमिकेविषयी खूप नर्व्हस होतो. पार्थमुळे मला ओळख मिळाली. आता पुन्हा एकदा पोरसच्या निमित्ताने मी त्याच नर्व्हसनेसचा अनुभव घेतो आहे. नक्कीच पार्थ ते पोरसच्या प्रवासातील अनेक गोष्टी मला बरंच काही शिकवून गेल्या.

*  ‘अधुरी कहानी हमारी’,‘प्यार तुने क्या किया’ या मालिकांमध्ये तू काम केलं आहेस. या व्यक्तिरेखांमधून तुला काय शिकायला मिळालं? 
- कलाकाराला मिळणाऱ्या  प्रत्येक व्यक्तिरेखेतून तो काही ना काही शिकतच असतो. आता हेच पाहा, मी आत्तापर्यंत निगेटिव्ह रोल, रोमँटिक रोल देखील साकारले आहेत. त्यामुळे मी प्रेक्षकांसमोर त्यांना हव्या त्या भूमिकेत उभा राहिलो आहे. माझ्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे. 

* पोरस या भूमिकेचा तू किती अभ्यास केला आहे?
- मी त्याबद्दल वाचताना बरेच संशोधन केले आणि शोवर आधारित ३५० बीसीच्या काळातल्या सर्व गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु मला पाहिजे तेवढी माहिती मिळू शकली नाही. मी सिद्धार्थ (कुमार तिवारी) सर आणि या शोवर काम करणाऱ्या  संपूर्ण टीमचा आभारी आहे. ज्यांनी मला ऐतिहासिक लढाई आणि पोरसबद्दल माहिती दिली आहे. स्क्रिप्ट देखील अत्यंत उत्कृष्ट बनवली आहे आणि प्रत्येकास न केवळ इतिहास चांगल्याप्रकारे समजून घेण्यास तर चांगले आणि प्रामाणिकरित्या काम करण्यास देखील मदत करते.

* या भूमिकेसाठी तू कोणती ट्रेनिंग घेतली होती?
- होय, एक महत्वाची भूमिका निभावण्यासाठी  सुरूवातीपासून मी व्यायामशाळेत माझ्या शरीराला पिळदार करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे. प्रामाणिकपणे माझ्याकडे यापूर्वी पिळदार शरीर नसल्याने या प्रकल्पाची माहिती मिळाल्यानंतर मला चार ते पाच महिने माझ्या शरीरावर अधिक काम करावे लागले. एका अभिनेत्यासाठी चांगले दिसणे महत्त्वाचे नाही. पण, अशा भूमिकेत योग्य दिसणे फारच महत्त्वाचे असते. तसेच मी लहानपणापासून मार्शल आर्टमध्ये असल्यामुळे मला जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्सचा अभ्यास करण्यास मदत झाली. मला घोडेस्वारी शिकायची होती आणि हा एक नवीन साहसी अनुभव होता. तसेच मी या शोसाठी तलवारबाजी शिकलो. शोच्या शूटिंगच्या सहा ते सात महिन्यांअगोदर तयारी सुरू झाली होती.

*  ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारताना किती जबाबदारी वाटते?
- खरंतर प्रत्येक भूमिका साकारताना कलाकारासाठी ती जबाबदारीच असते. मात्र, ऐतिहासिक भूमिका जास्त जबाबदारीने कराव्या लागतात. त्यांचे राहणीमान, वागणं-बोलणं या सर्व गोष्टी ध्यानात ठेवून अभिनय करावा लागतो.

*  सध्या टीव्ही शोचे कलाकार बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहेत. तुला संधी मिळाली तर करायला आवडेल का?
- होय, नक्कीच. बॉलिवूडमध्ये काम करायला मला प्रचंड आवडेल. तसा प्रोजेक्ट मिळाला तर मी नक्कीच मेहनत घेईन.

Web Title: Challenge for me to play a role. '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.