निलेश साबळेच्या नव्या कॉमेडी शोमध्ये 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्रीची एन्ट्री, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 09:44 AM2024-04-05T09:44:29+5:302024-04-05T09:44:55+5:30

भाऊ कदमनंतर 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्रीची एन्ट्री, निलेश साबळेच्या नव्या कॉमेडी शोमधून प्रेक्षकांना हसवणार

chala hawa yeu dya fame actress snehal shidam entry in nilesh sable new comedy show hastay na hasaylach pahije | निलेश साबळेच्या नव्या कॉमेडी शोमध्ये 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्रीची एन्ट्री, कोण आहे ती?

निलेश साबळेच्या नव्या कॉमेडी शोमध्ये 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्रीची एन्ट्री, कोण आहे ती?

'चला हवा येऊ द्या' या झी वाहिनीवरील कॉमेडी शोमधून घराघरात पोहोचलेला निलेश साबळे नव्या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलर्स वाहिनीवरील 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' हा नवा कोरा शो घेऊन निलेश साबळे पुन्हा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे.  नुकत्याच या कार्यक्रमाचा प्रोमो समोर आला आहे. निलेश साबळेबरोबर या शोमध्ये भाऊ कदम आणि ओंकार भोजनेही दिसणार आहेत. आता या शोमध्ये 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. 

'हसताय ना? हसायलाच पाहिजे' या निलेश साबळेच्या शोमध्ये भाऊ कदमनंतर आणखी एक 'चला हवा येऊ द्या' फेम कलाकार दिसणार आहे, अशी माहिती आहे. चला हवा येऊ द्यामधून घराघरात पोहोचली आणि अभिनयाबरोबर विनोदाची सांगड घालत प्रेक्षकांना खळखळवून हसवणारी अभिनेत्री स्नेहल शिदम पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' या शोमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्नेहलबरोबरच सुपर्णा श्याम, रोहित चव्हाण हे कलाकारही 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' शोमध्ये दिसणार आहेत. 

दरम्यान, कॉलेज जीवनापासूनच स्नेहलने अभिनयातील करिअरला सुरुवात केली होती. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या स्नेहलने मेहनतीच्या जोरावर कलाविश्वात स्थान मिळवलं आहे. 'चला हवा येऊ द्या' या शोमुळे स्नेहला लोकप्रियता मिळाली. 'भागो मोहन प्यारे', 'माझा होशील ना', 'देवमाणूस २' या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. त्याबरोबरच 'बॉईज ३' या सिनेमातही ती झळकली होती. 

Web Title: chala hawa yeu dya fame actress snehal shidam entry in nilesh sable new comedy show hastay na hasaylach pahije

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.