चक्क करणसिंग छाब्राची 'गुल्लू' व्यक्तिरेखा डोनाल्ड ट्रम्पवर आधारित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2017 10:14 AM2017-02-18T10:14:01+5:302017-02-18T16:23:06+5:30

बॉलीवूडमधील नामवंतांच्या मुलाखती घेण्याबद्दल प्रसिध्द असलेला करणसिंग छाब्रा आता ‘लाईफ ओके’वरील ‘हर मर्द का दर्द’ या नव्या मालिकेत नायक ...

Chakraborty Chabrabchi's 'Gullu' personality is based on Donald Trumpur | चक्क करणसिंग छाब्राची 'गुल्लू' व्यक्तिरेखा डोनाल्ड ट्रम्पवर आधारित

चक्क करणसिंग छाब्राची 'गुल्लू' व्यक्तिरेखा डोनाल्ड ट्रम्पवर आधारित

googlenewsNext
लीवूडमधील नामवंतांच्या मुलाखती घेण्याबद्दल प्रसिध्द असलेला करणसिंग छाब्रा आता ‘लाईफ ओके’वरील ‘हर मर्द का दर्द’ या नव्या मालिकेत नायक विनोद खन्ना (फैझल रशीद) याचा मित्र गुल्लू याची भूमिका साकारणार आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुल्लूची व्यक्तिरेखा ही ढोबळमानाने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यक्तिरेखेवर
आधारित असेल.त्याची व्यक्तिरेखा काहीशी अरेरावीची भाषा बोलते आणि महिलांना काय वाटते याला फारसे महत्त्व देत नाही. तो आपला मित्र विनोद खन्ना यालाही आपल्यासारखेच धोरण स्वीकारण्याचा सल्ला देत असतो,पण तो सल्ला विनोद मानत नाही. या व्यक्तिरेखेविषयी करणसिंह छाब्राने सांगितले, “माझ्या व्यक्तिरेखेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वभावाच्या काही छटा आम्ही ठेवल्या होत्या.पण अनावश्यक वाद टाळण्यासाठी आम्ही त्यात आता बदल केला आहे. प्रारंभीच्या भागांमध्ये माझी व्यक्तिरेखा महिलांचा आदर न करणारी आणि त्यांना महत्त्व न देणारी दाखविली गेली आहे.पण यावर आम्ही मालिकेशी संबंधित काही लोकांशी चर्चा केली आणि त्या व्यक्तिरेखेचा स्वभाव बदलला. आता माझ्या व्यक्तिरेखेला महिला समजुतीने वागवत असल्या, तरी त्याला आपल्या जवळ फिरकू देत नाहीत अशाप्रकारची आहे.या मालिकेतील स्त्रीची कथा ही आपल्या आजूबाजूला असणा-या स्त्रीयांची म्हणजेच ती एखाद्या मुलीची, आईची किंवा मग पत्नीची असेल. काही दिवसांनी समाजातील कर्तृत्ववान महिलांची म्हणजेच घराबाहेर काम करणा-या महिलांच्या मनातील गोष्टीचा आवाज रसिकांना या मालिकेतून ऐकायला मिळू शकतो.एकूणच काय तर महिलाच महिलांना समजू शकत असं बोललं जातं.मात्र या मालिकेच्या माध्यमातून पुरुषसुद्धा स्त्रीला तितक्याच चांगल्या रितीने समजू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.या मालिकेच्या निमित्ताने 

Web Title: Chakraborty Chabrabchi's 'Gullu' personality is based on Donald Trumpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.