​तारकमध्ये हा सेलिब्रेटी लावणार दिवाळीला हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 16:15 IST2016-10-26T16:15:25+5:302016-10-26T16:15:37+5:30

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत नेहमीच कोणते ना कोणते तरी सेलिब्रेटी हजेरी लावत असतात. आता या मालिकेत ...

This celebrity will be celebrating Diwali in Taraka | ​तारकमध्ये हा सेलिब्रेटी लावणार दिवाळीला हजेरी

​तारकमध्ये हा सेलिब्रेटी लावणार दिवाळीला हजेरी

रक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत नेहमीच कोणते ना कोणते तरी सेलिब्रेटी हजेरी लावत असतात. आता या मालिकेत अजय देवगण येणार आहे. अजय हिम्मतवाला, सन ऑफ सरदार यांसारख्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी याआधीही तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत आला होता आणि आता पुन्हा एकदा तो शिवाय या चित्रपटाच्या निमित्ताने या मालिकेत झळकणार आहे. 
दिवाळीची तयारी सध्या सर्वत्र सुरू आहे. प्रत्येकजण दिवाळीचे फराळ, शॉपिंग करण्यात व्यग्र आहे. गोकुळधाममध्येदेखील सध्या दिवाळीची धूम आहे. दिवाळी कशी साजरी करायची याचीच चर्चा सगळे करत आहेत. यंदा दिवाळी साजरा करण्यासाठी अजय देवगण गोकुळधाम सोसायटीमध्ये जाणार आहे. तसेच त्याच्यासोबत शिवाय या चित्रपटातील बालकलाकार एबीगेल एमेसदेखील असणार आहे. गोकुळधामवासियांसोबत तो दिवाळीच्या फराळावर ताव मारणार आहे. तसेच फटाकेदेखील फोडणार आहे. दयाबेन सोसायटीत कोणीही सेलिब्रेटी आल्यास त्यांची आरती आवर्जून ओवाळते. अजयचीदेखील ती स्पेशल आरती ओवाळणार आहे. एवढेच नव्हे तर सगळे मिळून गरबादेखील खेळणार आहेत. याविषयी दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वाकानी सांगते, "नेहमीच गोकुळवासियांची दिवाळी ही खूप वेगळी आणि स्पेशल असते. अजय देवगणच्या अभिनयाची मी फॅन आहे. त्याची संवाद म्हणण्याची स्टाईल मला खूप आवडते. त्याच्यासोबत चित्रीकरण करायला मजा आली. माधवी भिडेला एक चॉकलेटची भलीमोठी ऑडर मिळाली होती. पण ती अचानक रद्द झाल्याने माधवी खूपच चिंतेत असल्याचे मालिकेत दाखवले जाणार आहे. पण ही सगळी चॉकलेट्स एबीगेल एमेस खरेदी करणार असल्याने भिडे कुटुंबियांची दिवाळी खूप चांगली जाणार आहे."

Web Title: This celebrity will be celebrating Diwali in Taraka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.