Exclusive छोट्या पडद्यावर दिवाळी सेलिब्रेशन !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 15:50 IST2016-10-20T15:16:39+5:302016-10-20T15:50:53+5:30
दिवाळीची चाहुल लागताच सर्वत्र रांगोळ्या, आकाशकंदील, दिवाळीचा फराळ याची लगबग पाहायला मिळते.रिल आणि रिअल दोन्हीकडे दिवाळीची तयारी पाहायला मिळते. ...
Exclusive छोट्या पडद्यावर दिवाळी सेलिब्रेशन !
द वाळीची चाहुल लागताच सर्वत्र रांगोळ्या, आकाशकंदील, दिवाळीचा फराळ याची लगबग पाहायला मिळते.रिल आणि रिअल दोन्हीकडे दिवाळीची तयारी पाहायला मिळते. प्रत्येकासाठी दिवाळी ही एक खास असते. त्याचप्रमाणे कलाकारांसाठीही दिवाळी म्हटले की अगदी आनंदाचाच क्षण असतो. रसिकांचे भरघोस मनोरंजन करण्यासाठी कालाकार मंडळी टीव्हीवरच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरीही लावताना दिसतात.नुकताच सुरू झालेला 'कोण होईल मराठी करोडपती'मध्ये देखील दिवाळी दणक्यात सेलिब्रेट करण्यात आली.महेश मांजरेकर आणि त्यांच्या पत्नी मेधा मांजरेकर दिवाळी निमित्त कोण होईल मराठी करोडपतीच्या सेटवर आले होते.विशेष म्हणजे या भागामध्ये मेधा मांजरेकर यांनी ''ये राते ये मौसम'' हे गाणं महेश मांजरेकरांसाठी गाऊन पाडवा भेटच त्यांना दिली.यावेळी महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांनी कार्यक्रमाचा सूत्रसंचालक स्वप्नील जोशीसह दिलखुलास गप्पा मारल्या. त्यांची आजवरची कारकीर्द ते आवडता खेळ,खेळाडू याची माहिती अगदी मजेदार पद्धतीने देत क्रिकेट खेळायला अजूनही आवडते पण फुटबॉल आणि टेनिस हे खेळ बघायला आवडतात असे त्यांनी आवर्जून सांगितले.सध्या सुरु असलेल्या पाकिस्तानी अभिनेत्यांनी भारतातील सिनेमे करू नये वा करावे या वादावर देखील एका वाक्यात परखड मत देत म्हणाले “माझ्यासाठी माझा देश पहिला”. आहे असे म्हणत त्यांनी आपले मत व्यक्त केले. महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांनी एका संस्थेसाठी साठी तब्बल ६ लाख चाळीस हजार रुपयांची मदतही दिली आहे.१ नोव्हेंबर पासून कोण होईल मराठी करोडपती या कार्यक्रमामध्ये 'इच्छा माझी पुरी करा' हा नवा उपक्रम सुरु करण्यात येणार आहे ज्याद्वारे गरजू लोकांना मदत करण्यात येणार आहे.