​सुपर डान्सर २ च्या सेटवर साजरा करण्यात आला रित्विक धनजाणीचा वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 16:40 IST2017-11-02T11:10:47+5:302017-11-02T16:40:47+5:30

सुपर डान्सर या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक प्रेक्षकांचे मन जिंकताना आपल्याला दिसत आहेत. या कार्यक्रमात प्रेक्षकांना एकाहून एक सरस परफॉर्मन्स ...

Celebrated birthday celebration of Super Dancer 2 | ​सुपर डान्सर २ च्या सेटवर साजरा करण्यात आला रित्विक धनजाणीचा वाढदिवस

​सुपर डान्सर २ च्या सेटवर साजरा करण्यात आला रित्विक धनजाणीचा वाढदिवस

पर डान्सर या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक प्रेक्षकांचे मन जिंकताना आपल्याला दिसत आहेत. या कार्यक्रमात प्रेक्षकांना एकाहून एक सरस परफॉर्मन्स पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या कार्यक्रमात शिल्पा शेट्टी, गीता कपूर आणि अनुराग बासू परीक्षकाची भूमिका साकारत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रित्विक धनजाणी करत आहे. या मालिकेच्या सेटवर रित्विकला नुकतेच एक खूप चांगले सरप्राईज मिळाले असून त्यामुळे तो खूपच खूश आहे.
रित्विक धनजाणीचे सूत्रसंचालन प्रेक्षकांना खूपच आवडते. या कार्यक्रमाच्या सेटवर तर तो सगळ्यांचा लाडका आहे. तो सेटवर असल्यावर त्याच्या खेळकर स्वभावामुळे सगळेच खूश असतात. रित्विकचा नुकताच वाढदिवस झाला. त्याचा हा वाढदिवस कार्यक्रमाच्या सेटवर सगळ्यांनी मिळून खूप चांगल्या प्रकारे साजरा केला. रित्विकला सगळ्यांनी मिळून खूपच छान सरप्राईज दिले. रित्विकचा वाढदिवस असूनही तो सुपर डान्सर या कार्यक्रमाचे चित्रीकरण करत होता. त्याने हा दिवस या कार्यक्रमाचे स्पर्धक आणि परीक्षक यांच्यासोबतच घालवला. सुपर डान्सर मध्ये परितोष त्रिपाठीदेखील रित्विकसोबत सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसत आहे. त्याने रित्विकसाठी एक खूप छान बेत आखला होता. त्याने रित्विकचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सेटवर रित्विकची प्रेयसी आशा नेगी आणि त्याचा बेस्ट फ्रेंड रवी दुबेला बोलावले होते. आशा आणि रवीला सेटवर पाहून रित्विकला खूपच आनंद झाला. टीममधील एका व्यक्तीने सांगितल्यानुसार आशा नेगी आणि रवी दुबे यांना सेटवर बघून रित्विकला आश्चर्याचा धक्का बसला होता. काय सुरू आहे हेच थोड्या वेळ रित्विकला कळलेच नव्हते. त्याच्यासाठी हा एक सुखद क्षण होता. तसेच रित्विकचा वाढदिवस इतका चांगला साजरा केल्याबद्दल त्याने परितोषचे आभार मानले.
सुपर डान्सर शोचे आतापर्यंतचे सगळेच सिझन हिट गेले आहेत. या सिझनची देखील सध्या चांगलीच चर्चा आहे. या सिझनसाठी देशातील विविध शहरात ऑडिशन्स घेण्यात आल्या होत्या आणि या ऑडिशन्समधून एकूण १२ स्पर्धक निवडले गेले होते. 

Also Read : सुपर डान्सर २ च्या चित्रीकरणाच्या वेळी अनुराग बासूला का झाले अश्रू अनावर

Web Title: Celebrated birthday celebration of Super Dancer 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.