Barun Sobti : याला म्हणतात नशीब! नववीत पडला प्रेमात, 200 रु होता पहिला पगार; सीरियलने बदललं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 18:40 IST2023-06-09T18:20:43+5:302023-06-09T18:40:17+5:30
Barun Sobti : बरुण सोबतीच्या यशस्वी प्रवासाला सुरुवात झाली. टीव्ही शोने त्याला रातोरात लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. सध्या तो 'असुर 2' या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे.

Barun Sobti : याला म्हणतात नशीब! नववीत पडला प्रेमात, 200 रु होता पहिला पगार; सीरियलने बदललं आयुष्य
दिल्लीतील एका तरुणाने आपल्या अभिनयाने सर्वांचं मन जिंकलं आहे. अत्यंत देखणा आणि फिटनेसच्या बाबतीत भल्याभल्यांनाही मात देणारा हा तरुण एका टीव्ही मालिकेत श्रीमंत आणि गर्विष्ठ उद्योगपतीची भूमिका साकारत होता. ‘इस प्यार को क्या नाम दूं’ असं या मालिकेचं नाव होतं. येथूनच बरुण सोबतीच्या यशस्वी प्रवासाला सुरुवात झाली. या टीव्ही शोने त्याला रातोरात लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. सध्या तो 'असुर 2' या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे.
बरुण सोबती यांचा जन्म 21 ऑगस्ट 1984 रोजी दिल्ली येथे झाला. त्याच्या वडिलांचे नाव राज सोबती आणि बहिणीचे नाव रिचा अरोरा आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल इंटरनेटवर फारशी माहिती उपलब्ध नाही. त्याला त्याचे पर्सनल आणि प्रोफेशनल जीवन पूर्णपणे वेगळं ठेवणं आवडतं. योगायोगाने तो ग्लॅमरच्या जगातही आला. त्याला अभिनयात अजिबात रस नव्हता.
अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये टीव्ही अभिनेता बरुण सोबतीच्या शैक्षणिक पात्रतेचा उल्लेख करण्यात आला आहे. दिल्लीतील पश्चिम विहार येथील सेंट मार्क स्कूलमध्ये त्याने शिक्षण घेतलं. त्याच्या प्रेमाची आणि पत्नीची पहिली भेटही याच शाळेत झाली. बरुणच्या कॉलेज लाईफबद्दल फारशी माहिती नाही. पण काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतली आहे.
बरुण सोबती आज लाखो रुपये कमवत असेल, पण त्याचा पहिला पगार होता फक्त 200 रुपये, डिनर सेट विकून त्याने हे पैसे कमवले. लहानपणी बरुण खूप खोडकर होता आणि त्यामुळे त्याच्या आईला अनेकदा शाळेत बोलावलं जायचं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर, बरुणने 7 वर्षे बीपीओमध्ये ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून काम केलं. त्यानंतर 2009 मध्ये त्याचा मित्र करण वाहीच्या सल्ल्याने त्याने मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलं.
बरुण सोबतीची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे. त्याच्या पत्नीचे नाव पश्मीन मनचंदा आहे आणि ते दोघेही त्यांच्या शाळेत नववीत पहिल्यांदा भेटले होते. पश्मीन कॉलेजच्या अभ्यासासाठी ऑस्ट्रेलियाला गेली होती आणि त्या दोघांनीही अनेक वर्षे लाँग डिस्टेंस रिलेशन जपलं. आता या सुपरहिट कपलला एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन मुलं आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.