कॅटरिनाची धमाल मस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2017 17:31 IST2017-06-30T11:36:20+5:302017-06-30T17:31:29+5:30

कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर सध्या त्यांच्या जग्गा जासूस या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सगळीकडे जाताना दिसतायेत. नुकतेच ते सा रे ग ...

Catherine's great fun | कॅटरिनाची धमाल मस्ती

कॅटरिनाची धमाल मस्ती

टरिना कैफ आणि रणबीर कपूर सध्या त्यांच्या जग्गा जासूस या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सगळीकडे जाताना दिसतायेत. नुकतेच ते सा रे ग मा पा लिटिल चॅम्पस च्या मंचावर आले होते.    
दोघांनी धमाकेदार एन्ट्री घेत शोमध्ये मुलांसोबत धमाल मस्ती केली. लिटिल चॅम्सच्या स्पर्धकांचे परफॉर्मन्स पाहुन कॅट- रणबीर दोघे ही थक्क झाले. यावेळी मुलांना कॅटरिना कैफचे प्रसिद्ध चीकनी चमेली, शीला की जवानी सारखी हिट गाणी सादर केली. कॅटरिना यांनी मुलींची गाण्यांनी इतकी प्रभावित झाली की मंचावर जाऊन तिने या मुलींसोबत आपल्या गाण्यातल्या फेमस स्टेप केल्या, तेव्हा रणबीर कपूरने ही आदित्य नारायण बतमीज दिल या गाण्यावर आपला धमाकेदार परफॉर्मन्स दिला.
या मुलांचे परफॉर्मन्स बघून कॅटरिना म्हणाली, ''या मुलांचा या वयातील आत्मविश्वास पाहून मी स्वत: नर्व्हस झाले त्यांच्याबरोबर डान्स करताना मला खरंच दडपण आले होते.  त्यांचा परफॉर्मन्स, गाणं गातानाचा त्यांचा स्टेजवरचा कॉन्फिडन्स पाहता भविष्यात ते मोठ्या गायकांना सुद्धा चित करतील.''
रणबीर आणि कॅटरिनाने या मुलांसोबत स्टेजवर खूप धमाल मस्ती केली. कॅटरिना आणि रणबीरचा ब्रेकअप झाल्यानंतरचा हा पहिला चित्रपट आहे. त्यामुळे ब्रेकअपनंतर त्यांच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्री बघण्यासाठी त्यांचे फॅन्स उत्सुक आहेत.  अनेक अडचणीनंतर हा चित्रपट 14 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: Catherine's great fun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.