कास्टिंग काउचला बळी पडला ‘हा’ अभिनेता; ‘हार्ड काम करायचे की स्मार्ट?’ अशी दिली आॅफर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 20:58 IST2018-03-20T15:18:32+5:302018-03-20T20:58:23+5:30

टीव्हीच्या एका प्रसिद्ध अभिनेत्याने धक्कादायक खुलासा करताना करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये कास्टिंग काउचला बळी पडल्याचे सांगितले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या ...

Casting Couch, 'Ha' Actor; 'Hard to do hard work or not?' | कास्टिंग काउचला बळी पडला ‘हा’ अभिनेता; ‘हार्ड काम करायचे की स्मार्ट?’ अशी दिली आॅफर!

कास्टिंग काउचला बळी पडला ‘हा’ अभिनेता; ‘हार्ड काम करायचे की स्मार्ट?’ अशी दिली आॅफर!

व्हीच्या एका प्रसिद्ध अभिनेत्याने धक्कादायक खुलासा करताना करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये कास्टिंग काउचला बळी पडल्याचे सांगितले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले की, ज्या कास्टिंग डायरेक्टरने अभिनेता रणवीर सिंगकडून सेक्शुअल फेवर्सची मागणी केली होती, त्याच व्यक्तीने माझ्यासमोर एक अट ठेवली असल्याचे या अभिनेत्याने सांगितले. 

आता तुम्ही विचार करीत असाल की, हा अभिनेता कोण? तर या अभिनेत्याचे नाव करण ठक्कर आहे. त्याने सांगिंतले, एका प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टरने मला आॅफर करताना म्हटले होते की, तू हार्ड काम करणार की स्मार्ट काम करणार? जेव्हा मी रणवीर सिंगची मुलाखत बघत होतो, तेव्हा मला याबाबतची जाणीव झाली की, एजंटने माझ्यासमोर कामाच्या बदल्यात कॉम्प्रोमाइजची आॅफर ठेवली होती, तोच कास्टिंग कोआॅर्डिनेटर ‘पद्मावत’ अभिनेता रणवीर सिंगला अ‍ॅप्रोच झाला होता. 

२०१५ मध्ये अभिनेता रणवीर सिंगने खुलासा केला होता की, एका प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टरने मला मुंबई येथील त्याच्या घरी बोलावून, जर इंडस्ट्रीत यश मिळवायचे असेल तर स्मार्ट व्हावे लागेल, असे म्हटले होते. तसेच तुला सेक्सी व्हावे लागेल. कारण जो स्मार्ट आणि सेक्सी असतो तोच पुढे निघून जातो. रणवीरने म्हटले होते की, त्या डायरेक्टरचा हा सल्ला मला बºयाच दिवसांनंतर समजला. जेव्हा मी त्याची ही आॅफर धुडकावली होती, तेव्हा त्याचा चेहरा बघण्यासारखा होता. त्यानंतर मला लक्षात आले की, या डायरेक्टरला माझ्याकडून नेमके काय अपेक्षित होते. 



दरम्यान, करणने सांगितले की, आजही मला अशाप्रकारच्या आॅफर्सचा सामना करावा लागत आहे. खरं तर तुम्ही कुठल्या मार्गाने जाऊ इच्छिता यावरच हे सर्व काही अवलंबून असते. मी नेहमीच लोकांना सल्ला देत असतो की, त्यांनी योग्य मार्गाने चालावे. वास्तविक असे प्रसंग तुम्हाला इंडस्ट्रीबद्दल जवळून जाणून घेण्याची संधीच देत असतात. त्याचबरोबर जेव्हा तुम्हाला तुमच्या संघर्षांच्या दिवसांबद्दल विचारले जाते तेव्हा तुमच्याकडे त्यांना सांगण्यासाठी खूप काही किस्से असतात. 

करणने ‘एक हजारों मे मेरी बहना है’ या अत्यंत लोकप्रिय मालिकेत काम केले आहे. त्याव्यतिरिक्त ‘रंग बदलती दुनिया’मध्येही तो बघावयास मिळाला आहे. करणने इंडियाज गॉट टॅलेंट आणि द वॉयस यांसारख्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये होस्ट म्हणून काम केले आहे. तो लवकरच निर्माता करण जोहरच्या ‘स्टूडेंट आॅफ द ईयर-२’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे. 

Web Title: Casting Couch, 'Ha' Actor; 'Hard to do hard work or not?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.